गाडी चालवताना फोनवर बोललं तरी चलन कापलं जाणार नाही! Traffic चे नवीन नियम जाणून घ्या

Traffic Rules Change : जर पोलिसांनी असं केलं तर तुम्ही कोर्टात देखील याला आव्हान देऊ शकता.

Updated: Jan 20, 2022, 08:43 PM IST
गाडी चालवताना फोनवर बोललं तरी चलन कापलं जाणार नाही! Traffic चे नवीन नियम जाणून घ्या title=

मुंबई : ट्राफिकचे आणि वाहन चालवण्याचे नियम जवळ-जवळ सगळ्यांनाचा माहित आहे. त्यात हेल्मेट घालणे, सिटबेल्ट लावणे, सिग्नल न तोडणे आणि फोनवरती न बोलणे हे सगळ्यात महत्वाचे नियम आहे. ज्याबद्दल सर्वांनाच माहित आहे. तुम्ही जर असे करताना पकडले गेलात तर, ट्रॅफिक पोलिस तुमच्याकडून चलन कापतात किंवा आताच्या नवीन प्रणालीनुसार पोलिस फोटो काढतात आणि तुम्हाला चलान पाठवतात. परंतु या ट्रॅफिकच्या नियमांमध्ये एक बदल झाला आहे. जे जाणून घेतल्यावरती तुम्हाला आश्चर्य होईल. या नवीन नियमानुसार आता तुम्ही जर फोनवरती बोलताना दिसलात, तरी ट्रॅफिक पोलिस तुमचे चलन कापू शकणार नाही.

मीडिया रिपोर्टनुसार, जर पोलिसांनी असं केलं तर तुम्ही कोर्टात देखील याला आव्हान देऊ शकता.

पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की, फोनवर बोलताना मोबाईल फोन तुमच्या कानाला नसावा. म्हणजेच तुम्ही मोबाईल समोर किंवा हातात न घेता, त्याला हँड्सफ्री उपकरण जोडून तुम्ही फोनवर बोलू शकता. परंतु जर तुम्ही थेट मोबाईल वापरत असाल, तर तुमचे चलन बनवण्याचा अधिकार वाहतूक पोलिसांना असेल.

दंड लावला तर तुम्ही त्याला न्यायालयात आव्हान देऊ शकता

खुद्द केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत ही माहिती दिली आहे. वाहनचालक हँड्सफ्री यंत्र वापरत असतील आणि फोनवर बोलत असतील, तर सध्याच्या वाहतूक नियमांनुसार तो दंडनीय गुन्हा मानला जाणार नाही. अशा परिस्थितीत वाहतूक पोलिस तुम्हाला कोणताही दंड आकारू शकत नाहीत, जर कोणी दंड लावला असेल तर तुम्ही त्याला न्यायालयात आव्हान देऊ शकता.

केरळ काँग्रेसचे खासदार हिबी इडन यांनी लोकसभेत विचारले होते की, वाहन चालवताना मोबाईलवर हँड्सफ्री बोलणे हा मोटार वाहन कायदा 2019 च्या कलम 84 नुसार दंडनीय गुन्हा आहे का? याला उत्तर देताना रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे प्रमुख नितीन गडकरी म्हणाले की, वाहन चालवताना हँड्सफ्री कम्युनिकेशन यंत्र वापरून बोलणे हा या कायद्यानुसार दंडनीय गुन्हा नाही. जर तुम्ही हातात फोन घालून मोबाईलवर बोललात तर तुमचे चलन कापले जाईल.

विना हेल्मेट आढळल्यास परवाना निलंबित

मोटार वाहन कायदा 2019 अंतर्गत, हेल्मेटशिवाय स्वारांना लगाम घालण्यासाठी मजबूत व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला वाहतूक पोलिसांनी विना हेल्मेट पकडलं, तर ते तुम्हाला एक हजार रुपयांपर्यंत चलन लावू शकतात किंवा तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स 3 महिन्यांसाठी निलंबित केलं जाऊ शकतं.