या ५ फिल्डमध्ये आहे जास्त पैसा

 या ५ क्षेत्रांविषयी तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Nov 15, 2018, 01:17 AM IST
या ५ फिल्डमध्ये आहे जास्त पैसा  title=

मुंबई :  चांगल्या पगाराची नोकरी मिळावी म्हणून करीअरची सुरुवात चांगल्या फिल्डने करतात.  शिक्षण सुरू असतानाच या सर्व गोष्टींचा विचार केला जातो. जास्त पगाराची नोकरी मिळविणे हे खऱ्या अर्थाने आव्हान आहे. शिक्षण संपल्यावर लगेच कोणी मोठे पॅकेज देत नाही. पण शैक्षणिक ज्ञानाबरोबरच इतरही अनेक कौशल्य असल्यास तुमची स्वप्न पूर्ण होण्यास मदत होते. त्यामुळे या ५ क्षेत्रांविषयी तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. 

 १) बिझनेस अॅनालिस्ट

 तुम्ही बोद्धिक कौशल्य आणि तर्कशास्त्रात निपुण असाल तर या पदासाठी अनेक कंपन्या तुमची वाट पाहत आहेत. त्यामुळे बाहेर नोकऱ्यांची संधी नसली तरी ही नोकरी तुम्हाला बक्कळ रक्कम मिळवून देईल.  व्यवसाय क्षेत्रात काम करताना गणित आणि तांत्रिक गोष्टींमध्येही हुशार असणे या पदासाठी आवश्यक असते. यात सुरुवातीलाच ६ लाखांहून अधिक उत्पन्न कमाऊ शकता. 

 २) चार्टर्ड अकाऊंटंट

 प्रत्येकजण आपल्या नोकरीत रिस्पेक्ट आणि पगाराच्या शोधात असतात. त्यामुळे जर तुम्ही  चार्टर्ड अकाऊंटंट हे क्षेत्र निवडणार असाल तर तुम्हाला वर्षाला ५ लाखापर्यंतचे पॅकेज मिळू शकते. 
यामध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळण्यासाठी तुम्हाला बिझनेस आणि अकाऊंटन्सी विषयावर कमांड असणे आवश्यक असते. सर्वाधिक अनुभवी तुम्ही असल्यास २५ ते ३० लाख वार्षिक कमाई करु शकता. 

३)  मनी मॅन

प्रत्येक व्यक्तीला तसेच कंपनीला मनी मॅनची गरज असते. म्हणजे असा व्यक्ती जो कंपनीसाठी भांडवल उभे करण्यास,अर्थिक विषयातील सल्ला देईल. कंपनीला नफा मिळवून देणारे काम तुम्हालाही चांगली रक्कम मिळवून देईल. याच्या सुरुवातीलाच १२ लाख वार्षिक पगार मिळण्याची संधी असते तर दीर्घ अनुभवानंतर तुम्ही ५० लाखांहून अधिक वार्षिक कमाई करु शकता. 

४)तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्र

भूगर्भशास्त्रज्ञ, मरीन इंजिनिअर्स या फिल्डमधला अभ्यास तुम्ही करत असाल तर येणाऱ्या काळात तुम्हाला मनासारखा पगार मिळू शकतो.  या क्षेत्रात अनुभव असणारे लोक जास्त पगाराची मागणी करु शकतात. चांगल्या अनुभवानंतर २० ते २५ लाख रुपयांची नोकरी तुम्हाला मिळू शकते. 

५)व्यवस्थापन (मॅनेजमेंट)

सर्व कंपन्यांमध्ये व्यवस्थापन म्हणजेच मॅनेजमेंट महत्त्वाची भुमिका बजावत असते. 
संस्थेचे काम योग्य रितीने सुरू असण्याकडे लक्ष ठेवणे, संस्थेच्या भल्याचे निर्णय घेणे असे काम करण्याची संधी तुम्हाला यामध्ये मिळते.  या क्षेत्रात अनुभव असणारे लोक जास्त पगाराची मागणी करु शकतात.
सुरुवातीला तुम्हाला वार्षिक ३ लाख रुपये या क्षेत्रात नोकरी करुन मिळू शकतात. तर प्रदीर्घ अनुभवानंतर तुम्ही ७० ते ८० लाख रुपये कमाऊ शकता.