काँग्रेस राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक, कोण होणार अध्यक्ष?

 Congress leaders to meet for CWC meet today : काँग्रेस राष्ट्रीय कार्यकारिणीची आज महत्त्वाची बैठक आहे. 

Updated: Oct 16, 2021, 08:14 AM IST
काँग्रेस राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक, कोण होणार अध्यक्ष? title=
Pic Courtesy : PTI

नवी दिल्ली : Congress leaders to meet for CWC meet today : काँग्रेस राष्ट्रीय कार्यकारिणीची आज महत्त्वाची बैठक आहे. काँग्रेसच्या या वर्कींग कमिटीच्या बैठकीकडे लक्ष लागले आहे. अध्यक्षीय नेता निवडीवर चर्चा होणार आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीबाबत खलबते होणार आहे. (Top Congress leaders to meet for CWC meet today; word on elections for new party chief likely)

काँग्रेस अध्यक्ष निवडीवर प्रामुख्याने या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. 23 नेत्यांच्या समूहाचे नेते गुलाम नबी आझाद यांनी कार्यकारिणी बैठक बोलावण्याची मागणी केली होती. बैठकीत पाच राज्यांच्या निवडणुकांची रणनीती ठरण्याची शक्यता आहे. शेतकरी आंदोलन, महागाई या मुद्द्यांवरही चर्चा शक्य आहे. आज सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे. हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत.

काँग्रेसच्या पंजाब, छत्तीसगढ आणि राजस्थानमध्ये जेथे पक्षाची सत्ता आहे, अशा राज्यांच्या प्रदेश राजयकीय गोंधळाच्या दरम्यान ही बैठक होत आहे. संघटनात्मक निवडणुका, आगामी विधानसभा निवडणुका आणि सध्याची राजकीय परिस्थिती, लखीमपूर खेरी घटनेवर चर्चा होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे उच्चपदस्थ कार्यकर्ते पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीसाठी एकत्र येत असल्याने या अजेंडावर चर्चा होईल.

दरम्यान, या बैठकीदरम्यान, पक्षाचे नेतृत्व काँग्रेसचे नवीन अध्यक्ष निवडण्याच्या वेळापत्रकावर निर्णय घेण्याची शक्यता आहे. 3 ऑक्टोबर रोजी झालेल्या लखीमपूर खेरी चकमकीच्या पार्श्वभूमीवर आजची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ज्यामध्ये आठ शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला होता. ज्यात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांच्या ताफ्यातील एसयूव्हीने कथितरित्या पळवलेल्या चार शेतकऱ्यांचा समावेश होता. या बैठकीत महागाई, शेतकऱ्यांचे आंदोलन आणि देशाची आर्थिक परिस्थिती यासारख्या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

सीडब्ल्यूसीच्या बैठकीत पक्षांतर्गत वाढलेल्या काही मतभेदांच्या वादावर आणि पक्षाच्या निवडणुकीतील खराब प्रदर्शनावर चर्चा होईल. या बैठकीला काँग्रेसचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (राजस्थान), भूपेश बघेल (छत्तीसगड) आणि चरणजित चन्नी (पंजाब) या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, सीडब्ल्यूसी बैठकीसाठी दिल्लीला पोहोचले, त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्या अंबिका सोनी यांची भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वरिष्ठ काँग्रेस नेत्यांमधील बैठक सुमारे 2 तास चालली त्यानंतर राजस्थानचे मुख्यमंत्री जोधपूर हाऊसकडे रवाना झाले. गेहलोत यांनी सोनी यांच्यासोबत अनेक संघटनात्मक विषयांवर चर्चा केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गहलोत सीडब्ल्यूसीच्या बैठकीला उपस्थित राहण्याव्यतिरिक्त दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेणार आहेत.