जम्मू काश्मीरमधून मोठी बातमी; 11 दहशतवादी ठार

सर्वसामान्यांवर हल्ला केल्यानंतर पोलिसांनी दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.   

Updated: Oct 16, 2021, 07:13 AM IST
जम्मू काश्मीरमधून मोठी बातमी; 11 दहशतवादी ठार  title=
प्रतिकात्मक छाय़ाचित्र

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सुरक्षादलं आणि दहशतवाद्यांमध्य़े मोठी चकमक सुरु झाली. पुलवाना येथील पंपोर येथे ही चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार टॉप 10 दहशतवादी आणि लष्कर कमांडर उमर मुश्ताक खांडे याला सुरक्षा दलांकडून घेरण्यात आलं आहे. (Jammu Kashmir)

काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनीही पंपोर येथे झालेल्या या चकमकीची माहिती माध्य़मांना दिली. मुश्ताक काश्मीरमधील भगत येथे 2 पोलीस कर्मचाऱ्यांच्या हत्येसह इतर दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी असल्याची माहिती मिळत आहे. जम्मू काश्मीरमध्ये सर्वसामान्य नागरिकांवरील हल्ल्यानंतर या भागात 8 एनकाऊंटर करण्यात आले ज्यामध्ये आतापर्यंत 11 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, अशी माहितीही पोलीस अधिकाऱ्य़ांकडून देण्यात येत आहे. 

2021 मध्येच फेब्रुवारी महिन्यामध्ये मुश्ताकनं साकिबसह मिळून पोलीस अधिकाऱ्यांना निशाण्यावर घेतलं होतं. या दहशतवाद्यांनी बाराबुल्ला येथे पोलीस पार्टीवर गोळीबार केला होता. यामध्ये दोन पोलीस अधिकाऱ्यांना वीरमरण आलं होतं. हे दोन्ही अधिकारी काश्मीरमधीलच रहिवासी होते. सीसीटीव्हीमध्ये ही संपूर्ण घटना कैद झाल्यानंतर सर्वांनाच ती पाहून हादरा बसला होता.