Share Market मध्ये पडझड कायम, मात्र IT शेअर्समध्ये तेजी

आठवड्याच्या सुरवातीपासून शेअर बाजारात मोठी अस्थिरता दिसून आली होती. गुरुवारी शेअर बाजारमध्ये घसरण दिसून आली होती पण बाजार बंद होताना मात्र 

Updated: Aug 19, 2022, 10:02 AM IST
Share Market मध्ये पडझड कायम, मात्र IT शेअर्समध्ये तेजी  title=

Share Market :  आठवड्याच्या सुरवातीपासून शेअर बाजारात मोठी अस्थिरता दिसून आली होती. गुरुवारी शेअर बाजारमध्ये घसरण दिसून आली होती पण बाजार बंद होताना मात्र बाजार सावरल्याचं चित्र दिसून आलं. आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सुरवातीच्या सत्रात शेअर बाजार (Share Market) हलक्या तेजी सह सुरू झाला. सेन्सेक्स 52 अंकाच्या तेजीसह 60,350 वर सुरू झाला. तर निफ्टी 16 अंकाच्या तेजीसह 17,973 वर सुरू झाला. याशिवाय आज शेअर बाजारात 32 शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे तर 12 तेजीसह सुरू झाला. यात विशेषत: आयटी शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे.

आठवड्याच्या सुरूवातीपासून शेअर बाजारात मोठी अस्थिरता दिसून आली होती. पण सकाळी बाजार लाल चिन्हात उघडला पण नंतर हिरव्या चिन्हावर बंद झाला. सेन्सेक्स सुमारे 66.61 अंक अर्थात 0.11% च्या वाढीसह 60,326.74 वर बंद झाला, तर निफ्टी केवळ 20.95 अंकांच्या अर्थात 0.12% च्या वाढीसह 17,965.20 वर बंद झाला. दरम्यान पाच दिवसांच्या सततच्या वाढीनंतर अमेरिकन बाजारात घसरण पाहायला मिळाली. डाऊ जोन्स 172 अंकांनी घसरला आणि 33,980 च्या पातळीवर बंद झाला. याशिवाय  Nasdaq 165 अंकांनी घसरला. SGX निफ्टी 50 अंकांच्या कमजोरीसह 17950 च्या खाली घसरला. जपानचा निक्केई 300 अंकांनी घसरला.

 हे आहेत आजचे टॉप 10 शेअर्स 

कोटक बँक (KOTAKBANK)

एल अँड टी (LT)

टाटा कंझ्युमर्स (TATACONSUMERS)

अल्ट्राटेक सिमेंट (ULTCEMCO)

इंडसइंड बँक (INDUSINDBANK)

आयआरसीटीसी (IRCTC)

व्होल्टास (VOLTAS)

गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

डिक्सन (DIXON)