Gold Rate Today : आज पुन्हा स्वस्त झालं सोनं; जाणून घ्या दर

सोने-चांदीचे भाव गेल्या काही  महिन्यांपासून अस्थिर आहे आहेत. 

Updated: Mar 13, 2021, 05:27 PM IST
Gold Rate Today : आज पुन्हा स्वस्त झालं सोनं; जाणून घ्या दर  title=

नवी दिल्ली : सोने-चांदीचे भाव गेल्या काही  महिन्यांपासून अस्थिर आहे आहेत. शुक्रवारी सोन्याचे दर काही प्रमाणात वधारले होते. पण शनिवारी मात्र सोन्याचे दर उतरले आहेत. गुड रिटर्न वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार सोन्याचे दर 520 रूपयांनी घसरले आहेत. गेल्या व्यापारी सत्रात 10 ग्राम सोन्याचे दर 44 हजार 710 रूपयांवर पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-सोन्याचे दर  अनुक्रमे 1 हजार 707 डॉलर प्रतिऔंस आणि USD 25.67 डॉलर्स होते.

गुड्स वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये आज 22 कॅरेट सोन्याचे दर 43 हजार 520 रूपयांवर पोहोचले असून 24 कॅरेट सोन्यासाठी 44 हजार 520 रूपये मोजावे लागत आहे. तर दिल्लीत देखील सोन्याचे दर 310 रूपयांनी घसरले आहेत. 

दिल्लीत आज 22 कॅरेट सोन्याचे दर 43 हजार 990 रूपये असून 24 कॅरेट सोन्यासाठी 47 हजार 990 रूपये मोजावे लागत आहेत. तर चेन्नईत 20 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर क्रमशः 41 हजार 790 आणि 45 हजार 590 इतके आहेत.

सोन्याचे दर कमी होत असल्यामुळे सोने या धातूसाठी मागणी वाढली आहे. शिवाय लग्न सराई असल्यामुळे सोन्याची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. शिवाय सोन्याचे दर कमी झाल्यामुळे ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.