मुंबई : जर तुम्ही 8वी पास असाल आणि Government नोकरीच्या शोधात असाल, तर ही तुमच्यासाठी कामाची बातमी आहे. Indian Railwaysने एकूण 182 पदांसाठी ही भरती काढली आहे. भारतीय रेल्वेच्या डिझेल लोको मॉर्डनाईजेशन वर्क्सने (Diesel Loco Modernisation Works) Apprentice या पदासाठी भरती सुरु केली आहे.
या पदासाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार डिझेल लोको मॉर्डनाईजेशनच्या अधिकृत वेबसाइट dmw.indianrailways.gov.in ला भेट देऊन भारतीय रेल्वेकडे अर्ज करू शकतात, हा अर्ज 31 मार्च 2021 पर्यंत करावा.
या व्यतिरिक्त उमेदवार पुढील दिलेल्या लिंकवर क्लिक करु शकता https://dmw.indianrailways.gov.in/ त्याच बरोबर उमेदवारांना https://dmw.indianrailways.gov.in/uploads/files या लिंकवर संबंधित नोटीफीकेशन मिळू शकेल. यामध्ये एकूण 182 पदांसाठी भरती होणार आहे.
Indian Railways Recruitment 2021 साठी महत्वाच्या तारखा
ऑनलाइन Application सुरु होणारी तारीख : 12 मार्च, 2021
ऑनलाइन Applicationची अंतिम तारीख : 31 मार्च, 2021
Indian Railways Recruitment 2021 साठी रिक्त पदे
इलेक्ट्रीशियन- 70 पद
मॅकेनिक- 40 पदे
मशीनिस्ट- 32 पदे
फिटर- 23 पदे
वेल्डर- 17 पदे
Indian Railways Recruitment 2021 साठी शैक्षणिक पात्रता
इलेक्ट्रिशियन, मॅकॅनिक, मशीनिस्ट आणि फिटर या उमेदवारांनी किमान 50% गुणांसह दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले. तसेच संबंधित व्यक्ती आयटीआय (ITI)झालेले असावे.
वेल्डर- उमेदवार आठवी उत्तीर्ण असावे आणि वेल्डर ट्रेड में ITIआयटीआय केलेले असावे.
Indian Railways Recruitment 2021साठीची वयोमर्यादा
उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 24 वर्ष असावे.
Indian Railways Recruitment 2021 संबंधीत अधिक माहिती
निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी हजर राहावे लागेल. उमेदवारांना 1 वर्षासाठी स्टायपेंड म्हणून 7000 रुपये दिले जातील. तसेच 2 वर्षांच्या प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना दरमहा 7700 रुपये, तर 3 वर्षांसाठी उमेदवारांना दरमहा 8050 रुपये दिले जातील.