Petrol Diesel Price: 'या' शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर बदलले, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Petrol, diesel prices today: आठड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर जाहिर झाले असून यामध्ये वाहनधारकांना दिलासा मिळणार की नाही? जाणून घ्या तुमच्या शहरात पेट्रोल-डिझल महाग झाले की स्वस्त?  

Updated: Jan 16, 2023, 10:16 AM IST
Petrol Diesel Price: 'या' शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर बदलले, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर title=

Today Petrol Diesel Price on 16 JANUARY 2022:  कच्चा तेलाच्या दरात चढ- उताराची मालिका सुरूच आहे. गेल्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमतीत सातत्याने घसरण होत आहे. त्यानंतर आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर जाहिर करण्यात आले. यामध्ये काही शहरांमध्ये पेट्रोलच्या दरात वाढ झाली तर काही शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे (petrol diesel price) दर स्थिर आहेत. तर दुसरीकडे दिल्ली-मुंबई यासारख्या चार महानगरांमध्ये आजही पेट्रोल-डिझेलचे दर (mumbai petrol diesel rate) स्थिर असल्याचे दिसून आले आहेत. 

महत्त्वाच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Rate)

- दिल्लीत पेट्रोल 96.65 रुपये तर डिझेल 89.82 रुपये प्रति लिटर
– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये तर डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
- चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये तर डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
- कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

वाचां: विद्यार्थ्यांनो परीक्षेत कॉपी केला तर खैर नाही, परीक्षा केंद्रांवर उचलण्यात येणार मोठं पाऊल   

या शहरांमध्ये दर बदलले

- नोएडामध्ये पेट्रोल 96.65 रुपये तर डिझेल 89.82 रुपये प्रति लिटर 
-  गाजियाबाद पेट्रोल 96.58 रुपये तर डिझेल 89.75 रुपये प्रति लिटर 
- पाटणामध्ये पेट्रोल 107.80 रुपये तर डिझेल 94.56 रुपये प्रति लिटर

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर 

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.

घरबसल्या चेक करा नवे  दर 

तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात.  त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.