Petrol Rate Today: महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे दर किती बदलले? जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर

Petrol and Diesel Price : गेल्या वर्षी म्हणजे 22 मे 2022 या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाली होती. मात्र गेल्यावर्षभरापासून दर स्थिर आहेत. त्यामुळे  आज सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीबाबत दिसाला मिळाला आहे की नाही?

श्वेता चव्हाण | Updated: May 22, 2023, 08:47 AM IST
Petrol Rate Today: महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे दर किती बदलले? जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर  title=
today petrol and diesel price 22 may 2023

Petrol And Diesel Price on 22 May 2023 : संपूर्ण महाराष्ट्रात पेट्रोल (Maharashtra Petrol Rate) 107.05 रुपयांनी तर डिझेल 93.67 रुपयांनी विकले जाणार आहे.  21 मे 2023 पासून महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol and Diesel Rate) दरात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या महिन्यात 30 एप्रिल 2023 रोजी महाराष्ट्रात पेट्रोलच्या किमती सरासरी 107.05 रुपये प्रति लिटरच्या दराने बंद झाले होते तर डिझेल 93.67 रुपये प्रति लिटरच्या दराने बंद झाल्या. परिणामी या महिन्यात कोणताही बदल झाला नाही. इंधनाच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित असतात आणि त्या नियमितपणे सुधारल्या जातात. अनेक घटक किंमती निर्धारित करतात, जसे की रुपया ते यूएस डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत आणि इंधनाची मागणीवर आधारित असतात. या नवीन योजना लागू झाल्यानंतर जून 2017 पासून दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर अपडेट केले जातात.  

महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेलचे दर

शहर  पेट्रोल (रु.)  डिझेल (रु.)
अहमदनगर  106.64 93.46
अकोला  106.37 92.79
अमरावती  107.44  93.42
औरंगाबाद  107.28  93.72
भंडारा  107.01  93.62
बीड  107.96  94.35
बुलढाणा  106.96  93.35
चंद्रपूर  106.12 92.69
धुळे  106.61  92.57
गडचिरोली  107.03 93.55
गोंदिया  107.64  94.13
बृहन्मुंबई  106.31 94.44
हिंगोली  107.19  93.70
जळगाव  107.64  92.77
जालना  107.84  94.29
कोल्हापूर  107.56 93.09
लातूर  107.40  93.89
मुंबई शहर  106.31  94.27
नागपूर  106.64  93.17
नांदेड  108.87  95.30 
नंदुरबार  107.22 93.71
नाशिक  106.51  92.69
उस्मानाबाद  106.86  93.37
पालघर  106.75  92.26
परभणी  109.33  95.73
पुणे  106.85  93.36
रायगड  107.11  93.27
रत्नागिरी  107.05  94.52
सांगली  106.21  92.75
सातारा  106.44  92.94
सिंधुदुर्ग  107.77  94.25
सोलापूर  106.38  92.89
ठाणे  106.45 94.41
वर्धा  106.91  93.42
वाशिम  106.65  93.18
यवतमाळ  107.35  93.85

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या किंवा कमी झाल्या तरी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झाला नाही.  देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या पुढे गेले आहेत. देशातील तेल विपणन कंपन्यांनी 22 मे 2023 रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या नवीनतम किंमती अपडेट केल्या असून ताज्या किमतींनुसार 22 मध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आज पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. ऑइल मार्केटिंग कंपन्या रोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर अपडेट करतात. आजच्या किमतीनुसार त्यात कोणताही बदल झालेला नाही आणि सध्याच्या किमती दिलासादायक वाटतात.