Today Gold Silver Price : जागतिक बाजारातून मिळालेल्या संकेतांदरम्यान आज भारतीय बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी दिसून येत आहे. सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत असून आज देखील सोन्याचा भाव 0.11 टक्क्यांच्या वेगाने वाढला आहे. तर चांदीचे दर आज एमसीएक्सवर 0.16 टक्क्यांनी आहे.
महाराष्ट्रात सध्या लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. अशातच सोन्याच्या किंमती वाढल्याने ग्राहकांना महागाईचा फटका बसू शकतो. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.50 टक्क्यांनी वाढ होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 52,950 रूपयांवर आला आहे. तर, एक किलो चांदीचा दर 62,830 रुपये आहे.
मुंबईतील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 52,950
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 48,538
पुण्यातील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 52,950
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 48,538
1 किलो चांदीचा दर - 62,830
नाशिकमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 52,950
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 48,538
1 किलो चांदीचा दर - 62,830
नागपूरमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 52,950
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 48,538
1 किलो चांदीचा दर - 62,830
दिल्लीमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 52,900
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 48,492
1 किलो चांदीचा दर - 62,740
आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत किती आहे?
आता जागतिक बाजाराबद्दल बोलूया, आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होत आहेत. कालच्या व्यवहारादरम्यान दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत घसरण झाली असली तरी आज ते तेजीचे ट्रेंड दाखवत आहेत. मंगळवारी, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची स्पॉट किंमत 0.44 टक्क्यांनी वाढून 1,771.28 डॉलर प्रति औंस झाली आहे, तर चांदीची किंमतही 1.92 टक्क्यांनी वाढून 22.01 डॉलर प्रति औंस झाली आहे.