नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार दिसून येत आहेत. सोन्याचे दर अस्थिर असल्यामुळे सोने खरेदी करावं की नाही असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. लग्न सराई असल्यामुळे सोने खरेदीकडे लोकांचा कल आहे. मात्र सोन्याच्या दरात होत असलेली वाढ पाहता ग्राकांच्या चोहऱ्यावर नाराजी दिसून येत आहे. आज 10 ग्राम सोन्यासाठी ग्राहकांना 46 हजार 340 रूपये मोजावे लागत आहेत. याआधी सोन्यासाठी 45 हजार 561 रूपये मोजावे लागत आहेत. मागील आठ महिन्यातील सोन्याचा हा सर्वात कमी दर होता.
सोन्यासोबतच चांदीचे दर देखील वाढत आहेत. एमसीएक्सने दिलेल्या माहितीनुसार चांदीचे दर 69 हजार 590 रूपये प्रति किलो ग्राम पोहोचले आहेत. अमेरिकन डॉलर खाली आल्यामुळे सोन्याचे दर वाढले आहेत. आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे स्थान 0.3 टक्क्यांनी वधारून ते 1,787.31 डॉलर प्रति औंस झाले.
2020 मध्ये सोन्याचे दर वाढले होते, मात्र आर्थिक बजेट सादर झाल्यानंतर सोन्याचे दर घसरले. ऑगस्ट महिन्याच्या उच्चांक दरानंतर सोन्याचे दर प्रति 10 ग्राममागे 10 हजार रूपयांनी खाली पडले आहेत. त्यानंतर सोन्यात सातत्याने घसरण सुरु आहे. गेल्या तीन आठवड्यात सोने जवळपास तीन हजारांनी स्वस्त झाले आहे. good returns या वेबसाईटनुसार आज सोमवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५१३० रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४६१३० रुपये आहे.