CoWIN Data Leak: करोना लस (Covid Vaccine) घेताना देण्यात आलेली नागरिकांची माहिती ऑनलाइन लीक झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहेत. तृणमूल काँग्रेसचे नेत साकेत गोखले (TMC Leader Saket Gokhale) यांनी हा आरोप केला आहे. त्यांनी ट्वीटरला (Twitter) या आरोपाला दुजोरा देणारे स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत. त्यांच्या आरोपानुसार, करोना लस (Covid Vaccine) घेणाऱ्या अनेक नागरिकांसह राजकीय नेते तसंच पत्रकांरांची खासगी माहिती ऑनलाइल लीक (Leak) झाली आहे. तसंच केंद्र सरकार अद्यापही अनभिज्ञ कसं काय आहे अशी विचारणाही त्यांनी केली. यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली आहे.
तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते साकेत गोखले यांनी ट्विटरला एकामागोमाग एक अनेक ट्वीट केले आहेत. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, "धक्कादायक! मोदी सरकारचा मोठा डेटा लीक झाला आहे. करोना लस घेताना नागरिकांनी दिलेली माहिती ऑनलाइन लीक झाली आहे. यामध्ये त्यांचे मोबाइल नंबर, आधार नंबर, पासपोर्ट नंबर, मतदान ओळखपत्र, कुटुंबाची माहिती इत्यादी गोष्टी आहेत. ही सर्व माहिती लीक झाली असून, सहजपणे उपलब्ध आहे".
SHOCKING:
There has been a MAJOR data breach of Modi Govt where personal details of ALL vaccinated Indians including their mobile nos., Aadhaar numbers, Passport numbers, Voter ID, Details of family members etc. have been leaked & are freely available.
Some examples
(1/7)
— Saket Gokhale (@SaketGokhale) June 12, 2023
साकेत गोखले यांनी आरोपी करताना सोबत ज्यांची माहिती लीक झाली आहे त्याचे फोटो जोडले आहेत. यामध्ये विरोधी पक्षातील खासदार, पत्रकार दिसत आहेत. तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रियन, माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम, काँग्रेस नेते जयराम रमेश, के सी वेणुगोपल, राज्यसभेचे उपसभापती हरिबंश नारायण सिंग, राज्यसभा खासदार सुष्मिता देव, अभिषेक मनू सिंघवी, संजय राऊत यांचा यात समावेश आहे.
4. Deputy Chairman Rajya Sabha Haribansh Narayan Singh
5. Rajya Sabha MPs Sushmita Dev, Abhishek Manu Singhvi, & Sanjay Raut@harivansh1956 @SushmitaDevAITC @DrAMSinghvi @rautsanjay61
(3/7) pic.twitter.com/7Wzyhx1Rfr
— Saket Gokhale (@SaketGokhale) June 12, 2023
तसंच काही वरिष्ठ पत्रकारांचाही डेटा लीक झाला आहे. साकेत गोखले यांनी ट्वीटमध्ये जोडलेल्या स्क्रीनशॉटमध्ये राजदीप सरदेसाई, बरखा दत्त, राहुल शिवशंकर यांची नावं दिसत आहेत.
"करोना लस घेतलेल्या अक्षरश: प्रत्येक भारतीय नागरिकाची माहिती सहजपणे या लीक डेटाबेसमध्ये उपलब्ध आहे," असा दावा साकेत गोखले यांनी केला आहे.
The personal details of LITERALLY EVERY INDIAN who got a Covid-19 vaccination are freely available on this leaked database.
Question is:
How did personal details incl passport no, Aadhaar no., etc. get leaked when Modi Govt claims it follows "strong data security"?
(5/7)
— Saket Gokhale (@SaketGokhale) June 12, 2023
यानिमित्ताने साकेत गोखले यांनी ट्विटच्या माध्यमातून जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले आहेत की "मोदी सरकार अतिशय उत्तम डेटा सुरक्षा असताना पासपोर्ट क्रमांक, आधार क्रमांक अशी खासगी माहिती लीकच कशी काय होऊ शकते हा प्रश्न आहे. मोदी सरकार, गृहमंत्रयाला ही माहिती लीक झाल्याची माहिती कशी मिळालेला नाही. तसंच भारतीयांना या डेटा लीकची माहिती का देण्यात आलेली नाही? भारतीयांचा आधार, पासपोर्ट क्रमांक असणाऱ्या इतकी संवेदनशील माहिती हाताळण्याचे अधिकार कोणाला देण्याला आला होता, ज्यामुळे ही माहिती लीक झाली?".
This is a matter of serious national concern.
And predictably, the Minister in-charge of this is @AshwiniVaishnaw who heads the Electronics, Communications, & IT portfolios in addition to Railways.
How long will incompetence of @AshwiniVaishnaw be ignored by PM Modi?
(7/7)
— Saket Gokhale (@SaketGokhale) June 12, 2023
हा देशासाठी गंभीर चिंतेचा विषय असल्याचं साकेत गोखले म्हणाले आहेत. "अश्विनी वैष्णव यांच्याकडे रेल्वे व्यतिरिक्त इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन आणि आयटी विभागाचीही जबाबदारी आहे. अश्विनी वैष्णव यांच्या अकार्यक्षमतेकडे पंतप्रधान मोदी किती काळ दुर्लक्ष करतील?", अशी विचारणा गोखले यांनी केली आहे.