Tirumala Temple : तिरूपती मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी राहणार बंद, काय आहे कारण?

आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात असलेले तिरुमाला तिरुपती येथील वेंकटेश्वर स्वामी मंदिर हे सर्व वैष्णवांचे देवस्थान अतिशय प्रसिद्ध आहे. ह्या देवळात भगवान विष्णू हे श्री वेंकटेश्वरांच्या रुपात निवास करतात अशी भक्तांची धारणा आहे. 

Updated: Oct 12, 2022, 11:08 AM IST
Tirumala Temple : तिरूपती मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी राहणार बंद, काय आहे कारण? title=

Tirumala Temple : आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात असलेले तिरुमाला तिरुपती येथील वेंकटेश्वर स्वामी मंदिर हे सर्व वैष्णवांचे देवस्थान अतिशय प्रसिद्ध आहे. ह्या देवळात भगवान विष्णू हे श्री वेंकटेश्वरांच्या रुपात निवास करतात अशी भक्तांची धारणा आहे. मात्र तिरुमला येथील प्रसिद्ध भगवान व्यंकटेश्वर मंदिर 25 ऑक्टोबरला सूर्यग्रहण आणि 8 नोव्हेंबरला चंद्रग्रहण असल्यामुळे या दोन्ही दिवशी मंदिर दर्शनासाठी सुमारे 12 तास बंद राहणार आहे. 24 ऑक्टोबरला दिवाळी असल्याने यावेळी सूर्यग्रहणाला विशेष महत्त्व आहे. यावेळी भाविकांना कोणत्याही प्रकारे दर्शन घेता येणार नाही.

25 ऑक्टोबरला ‘सूर्यग्रहण’ असल्यामुळे पहाडी मंदिराचे दरवाजे सकाळी 8.11 ते संध्याकाळी 7.30 पर्यंत बंद केले जातील. नंतर, भाविकांना प्रार्थना करण्यास परवानगी दिली जाईल, असे मंदिराच्या अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले. पुन्हा 8 नोव्हेंबर रोजी ‘चंद्रग्रहणा’मुळे प्राचीन मंदिराचे दरवाजे सकाळी 8.40 ते संध्याकाळी 7.20 पर्यंत बंद राहणार आहेत. या दोन दिवसाच्या ग्रहण काळात मिरवणूक किंवा देवताना ‘कल्याणोत्सवा’ सह अन्य कोणतेही विधी केले जाणार नसल्याचे मंदिर अधिकाऱ्याने सांगितले आहे.

वाचा :  Railway ने प्रवास करणार असाल तर हे नियम तुम्हाला माहितं असायलाच हवेत!

सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या दोन्ही काळात प्रसंगी देशातील अनेक प्रमुख मंदिरांचे दरवाजे भाविकांच्या दर्शनासाठी बंद राहणार असल्याचे वृत्त समजत आहे. जगप्रसिद्ध तिरुपती मंदिराचाही यामध्ये समावेश आहे. ग्रहणाचा कालावधी असेपर्यंत मंदिरे बंद राहतील आणि ग्रहण संपल्यानंतर पुन्हा वेदमंत्राने दरवाजे पुन्हा उघडले जातील, असे मंदिर अधिकाऱ्याने सांगितले आहे.