मुंबई : युपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेत वयाच्या २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात देशात प्रथम क्रमांक पटकवणारी आयएएस अधिकारी टीना दाबी पुन्हा लग्नबंधनात अडकणार आहे. तिने आपल्या इंस्टाग्राम पेजवर आपल्या होणाऱ्या जोडीदारासोबतचे फोटो शेअर केले आहेत.
टीना दाबी 2016 च्या आयएएस बॅचची अधिकारी आहे. सध्या ती राजस्थानमध्ये कार्यरत आहे. ती 2013 च्या बॅचचे आयएएस अधिकारी प्रदीप गवांडे (IAS Pradeep Gawande)यांच्यासोबत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
टीना दाबी युपीएससी परीक्षेतील आपल्या उतुंग यशामुळे देशभरात प्रसिद्ध झाली होती. त्याच वर्षी दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले अतहर खान यांच्याशी तिने लग्न केलं होतं. देशभरात त्यांच्या लग्नाची चर्चा झाली होती.
परंतू दोन वर्षात त्यांनी परस्पर सहमतीने घटस्फोट घेतला. अतहर खान यांनी देखील राजस्थान केडर सोडून आपले होम केडर काश्मीरमध्ये बदली करून घेतली.
टीना मुळची दिल्ली येथील आहे. गेल्या वर्षी तिची लहान बहिण रिया देखील आपल्या पहिल्याच प्रयत्नात युपीएससी उत्तीर्ण झाली होती.