पती आणि मुलांचे हात-पाय बांधून डोळ्यांदेखत तीन महिलांवर सामूहिक बलात्कार; अडीच तास सुरु होतं दुष्कर्म, अन् नंतर...

हरियाणाच्या पानीपत येथे धक्कादायक घटना घडली आहे. येथे 4 जणांनी मिळून तीन महिलांवर सामूहिक बलात्कार केला. यानंतर चोरी करुन ते फरार झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसरा, चोरी करताना एका महिलेची हत्याही करण्यात आली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.   

शिवराज यादव | Updated: Sep 22, 2023, 12:39 PM IST
पती आणि मुलांचे हात-पाय बांधून डोळ्यांदेखत तीन महिलांवर सामूहिक बलात्कार; अडीच तास सुरु होतं दुष्कर्म, अन् नंतर... title=

हरियाणाच्या पानीपत येथील एक खळबळजनक घटना समोर आली आहे. तीन महिलांवर चौघांनी मिळून सामूहिक बलात्कार केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपींनी महिलांच्या कुटुंबासमोरच हे दुष्कर्म केलं. पती आणि मुलांच्या डोळ्यांदेखत हा सगळा प्रकार घडला. बुधवारी ही घटना घडल्याचं समजत आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री हा सगळा प्रकार घडला. आरोपी चाकू आणि धारदार शस्त्र घेऊन आले होते. रिपोर्टनुसार, पीडित कुटुंब वास्तव्य करत असलेल्या घऱात चारही आरोपी घुसले होते. यानंतर आरोपींनी तिन्ही महिलांवर बलात्कार करण्याआधी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे हात, पाय दोरीच्या सहाय्याने बांधले होते. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पीडितांच्या घऱातील रोख रक्कम आणि दागिनेही लुटून नेले. दरम्यान, आरोपींनी सामूहिक बलात्कार केलेल्या ठिकाणापासून तब्बल एक किमी अंतरावर एका आजारी महिलेवरही हल्ला केला. या या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला. तसंच तिच्या पतीला यावेळी लुटण्यात आलं. आरोपी मोबाईल आणि रोख रक्कम घेऊन फरार झाले आहेत. 

पीडित महिलांनी काय सांगितलं?

पीडित महिलांनी यासंबंधी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महिलांनी पोलीस तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, रात्री जवळपास 1 वाजण्याच्या सुमारास चार तरुण घरात शिरले आणि त्यांच्या पतींना एका खोलीत बंद केलं. यानंतर त्यांनी आमच्यावर बलात्कार केला. यावेळी सर्व आरोपींनी चेहऱ्यावर रुमाल बांधला होता.  

पीडित महिलांच्या म्हणण्यानुसार, जवळपास अडीच तास आरोपी त्यांच्यावर बलात्कार करत होते. या संपूर्ण प्रकारादरम्यान कुटुंबाला बंधक ठेवण्यात आलं होतं. सकाळी पाच वाजता पीडित महिलांनी गावकऱ्यांना आवाज देत सगळा घटनाक्रम सांगितलं. घरी पोहोचलेल्या ग्रामस्थांनी कुटुंबाची सुटका करत त्यांना बाहेर काढलं. 

आरोपींकडून एका महिलेची हत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सामूहिक बलात्कार झालेल्या ठिकाणापासून जवळपास 1 किमी अंतरावर एका आजारी महिलेवर आरोपींनी हल्ला केला. या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला. आरोपींनी तिच्या पतीला लुटलं. आरोपी मोबाईल आणि कॅश घेऊन फरार झाले आहेत. 

पीडित पतीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्याच्या गळ्यावर तलवार ठेवली आणि चोरी केली. आपण त्यांच्याकडे दयेची भीक मागत होतो पण त्यांनी ऐकलं नाही. त्यांनी केलेल्या मारहाणीमुळेच पत्नीचा मृत्यू झाला. 

आतापर्यंत अटक नाही

या घटनेचा तपास करणारे पोलीस अधिकारी विनोद कुमार यांनी सांगितलं आहे की, "मटलोदा ठाणे क्षेत्रात एकाच घरात राहणाऱ्या महिलांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, त्यांच्यावर सामूहिक बलात्कार आणि चोरी झाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपास सुरु आहे. आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही".