West Bengal : पश्चिम बंगालमध्ये झारखंडमधील (Jharkhand) काँग्रेसच्या तीन (Congress MLA) आमदारांना मोठ्या रकमेसह पकडण्यात आले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आमदारांकडे मिळालेली रक्कम एवढी आहे की मशीनशिवाय मोजता येणार नाही. जप्त केलेले पैसे मोजण्यासाठी मशिनची वाट पाहत असल्याचे पोलिसांनी सांगितले. हावडा पोलीस अधीक्षक स्वाती भंगालिया यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या तिघांमध्ये इरफान अन्सारी आमदार जमतारा, राजेश कछाप आमदार आमदार आणि नमन बिक्सल आमदार कोलेबीरा आहेत.
एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड जप्त झाल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. झारखंड भाजपचे सरचिटणीस आदित्य साहू म्हणाले की, झारखंडमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यापासून भ्रष्टाचार सातत्याने वाढत आहे. यापूर्वी झारखंडमधील अधिकाऱ्यांच्या घरातूनही रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. हे लोक जनतेच्या कष्टाच्या पैशाचा दुरुपयोग करत आहेत.
दरम्यान, शनिवारी संध्याकाळी झारखंडच्या जामतारा येथील काँग्रेसच्या तीन आमदारांना हावडा ग्रामीण पोलिसांनी मोठ्या प्रमाणात रोख रकमेसह ताब्यात घेतले. हे सर्वजण एका गाडीमध्ये बसून पूर्व मिदनापूरच्या दिशेने जात होते. त्यांची गाडी पाचला पोलिस ठाण्यांतर्गत राणीहाटी मोरजवळ थांबली. त्यानंतर गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये मोठी रोकड सापडली.
Howrah,West Bengal| We've nabbed 3 MLAs of Congress from Jharkhand namely Irfan Ansari, MLA from Jamtara, Rajesh Kachhap, MLA from Khijri & Naman Bixal, MLA from Kolebira with huge amounts of cash. We would only be able to count it once counting machines come: SP Swati Bhangalia pic.twitter.com/yo8VYyW9Yq
— ANI (@ANI) July 30, 2022
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक स्वाती भंगालिया घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी सांगितले की, गुप्त माहितीच्या आधारे राणीहाटी मोर येथे विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली. दरम्यान, झारखंडमधील जामतारा येथून येणारी एक गाडी थांबवण्यात आली. गाडीमध्ये जामतारा येथील काँग्रेसचे तीन आमदार होते आणि त्यांच्याकडे बेहिशेबी रोकड आढळून आली