RSSची मुंबईत तीन दिवसीय बैठक, राम मंदिरावर होणार चर्चा

बैठकीत देशभरातून संघाचे पदादिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होतील

Updated: Oct 30, 2018, 10:58 AM IST
RSSची मुंबईत तीन दिवसीय बैठक, राम मंदिरावर होणार चर्चा title=

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय कार्यकारिणीची तीन दिवसीय बैठक ३१ ऑक्टोबरपासून मुंबईत सुरू होणार आहे. मंगळवारी ३० ऑक्टोबर रोजी तीन दिवसीय बैठकी विषयी विविध मुद्यांवर एक बैठक होईल. यात तीन दिवसीय बैठकीची रुपरेषा तयार करण्यात येतेय. या बैठकीत आरएसएसशी निगडीत ५४ संघटना सहभागी होतील. बैठकीत देशभरातून संघाचे पदादिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होतील. 

तीन दिवसीय बैठकीत राजनैतिक मुद्यांसोबतच अयोध्या राम मंदिर निर्माण, देशाची सुरक्षा, सीमा क्षेत्राचा विकास, नवीन शिक्षण नीति तसंच स्वदेशी वस्तुंचं निर्माण यांसारख्या अनेक मुद्यांवर चर्चा होऊ शकते. 

मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीतला मुख्य मुद्दा असेल तो राम मंदिराचा... वर्षातून एकदा आयोजित करण्यात येणाऱ्या या अखिल भारतीय कार्यकारिणी बैठकीला दिवाळी बैठकही संबोधण्यात येतं. ही बैठक दरवर्षी विजयादशमीनंतर आणि दीपावलीपूर्वी आयोजित करण्यात येते. 

या बैठकीत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह सुरेश जोशी, उपाख्य भैयाजी, सह-सरकार्यवाह सुरेश सोनी, डॉ. कृष्ण गोपाल, दत्तात्रय होसबले, व्ही. भागय्या, डॉ. मनमोहन वैद्य यांच्यसोबतच देशभरातील ३०० प्रमुख पदाधिकारी सहभागी होतील.