भरपूर पैसा मिळवून देणारे 4 शेअर; 50 हजार रूपयांचे झाले 80.65 लाख रूपये

शेअर विकत घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फार महत्त्वाचं आहे. 

Updated: Jun 28, 2021, 12:53 PM IST
भरपूर पैसा मिळवून देणारे 4 शेअर; 50 हजार रूपयांचे झाले 80.65 लाख रूपये title=

मुंबई : आज अनेकांचा पैसे कमण्याचा मार्ग  म्हणजे शेअर. कित्येक जण शेअरमुळे मालामाल झाले तर काहींना मात्र मोठं नुकसान सहन करावं लागलं. त्यामुळे कोणत्याही कंपनीचे शेअर विकत घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फार महत्त्वाचं आहे. असे अनेक शेअर आहेत ज्यामुळे अनेकांना गुंतवलेल्या पैशांपेक्षा दुपटीने पैसे मिळाले आहेत. तर आज जाणून घेवू असे काही शेअर ज्यामुळे तुम्ही  मालामाल व्हाल...

1. MRF
जवळपास 20 वर्षांपूर्वी, ऑगस्ट 2001 मध्ये, एमआरएफचे शेअर 500 रुपयांपर्यंत घसरले होते. तेव्हा जर तुम्ही एमआरएफचे 100 शेअर खरेदी केले असतील म्हणजे 50 हजार रूपये गुंतवले असतील तर विचार आज त्या 50 हजार रूपयांची किंमत आज काय असेल. 

आज एमआरएफचे शेअर NSEवर 80 हजार 818 वर ट्रे़ड करत आहे. याचा अर्थ ते 50 हजार रूपयांची किंमत  आज 80.81 लाख रूपये असती.  एमआरएफ शेअर गेल्या वर्षी 11 फेब्रुवारी रोजी 98 हजार 600 रूपयांवर पोहोचला होता. 

2. Honeywell Automation
ही कंपनी Honeywell सब्सिडियरी कंपनी आहे. कंपनीचे  हेडक्वार्टर कॅलिफोर्नियामध्ये आहेत फेब्रुवारी 2003मध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत 130 ते 140 रूपये होती. तेव्हा जर या कंपनीचे 100 शेअर खरेदी केले असते तर तुम्हाला त्यासाठी 13 हजार रूपये  मोजावे लागले असते. आज NSEवर Honeywell Automationशेअरची किंमत 40 हजार 262 रूपये आहे. म्हणजे 18 वर्षांमध्ये  तुमचे 13 हजार रूपये 40.2 लाख रूपये झाले असते. 

3. Page Industries
मार्च 2007मध्ये  Page Industries कंपनीचे शेअर 271 रूपयांवप पोहोचले होते. जर या कंपनीचे 100 शेअर खरेदी केले असते तर तुम्हाला त्यासाठी 27 हजार 100 रूपये  मोजावे लागले असते. जवळपास 14 वर्षांनंतर  NSE वर  Page Industriesचे शेअर 29 हजार 500 रूपयांवर पोहोचले आहेत. 

4. Shree Cements
 2001साली श्री सीमेंट्स देश कंपनीच्या शेअरची किंमत 30 रूपये होती. तेव्हा जर या कंपनीचे 100 शेअर खरेदी केले असते तर तुम्हाला त्यासाठी 3 हजार रूपये  मोजावे लागले असते. आज श्री कंपनीचे शेअर 38 हजार 870 रूपये आहे. म्हणजे आज तुम्हाला त्या 100 शेअरची किंमत 28.8 लाख रूपये असती.