'हा' शेअर पोहचला 270 रूपयांवरून 50,000 रूपयांवर

एका multibagger stock ने नुकतीच एक मोठी मजल मारली आहे.

Updated: Aug 12, 2022, 11:45 PM IST
'हा' शेअर पोहचला 270 रूपयांवरून 50,000 रूपयांवर title=

Multibagger Stock : शेअर बाजारातील गुंतवणूकादारांसाठी दररोज एक चढाओढ असते. खरंतर शेअर मार्केटमध्ये गुतंवणूक करून करोडपती व्हायचे असेल तर तुम्हाला धीर धरणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 

सध्या शेअर मार्केटमधून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एका multibagger stock ने नुकतीच एक मोठी मजल मारली आहे. Page Industries या कंपनीचा शेअर शुक्रवारी (12 ऑगस्ट) 50,000 रूपयांपर्यंत पोहचला आहे. त्यामुळे हा शेअर सध्या टॉपवर आहे. 

Page Industries Ltd ने गुरुवारी जून 2022 ला संपलेल्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफ्यात 207 कोटींची प्रभावी वाढ नोंदवली होती. यानंतर त्या कंपनीचा महसूल 1,341 कोटी रुपयांवर पोहोचला. 

Page Industries Ltd ही कंपनी उत्पादन आणि किरकोळ विक्रीचा व्यवसाय करते. भारतासोबतच श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, ओमान, कतार, मालदीव, भूतान आणि दुबईमध्ये आंतराष्ट्रीय परवाने आहेत. या कंपनीचा स्टॉक मार्च 2007 मध्ये फक्त 270 रुपयांना लिस्ट झाला होता. म्हणजेच 15 वर्षात हा multibagger stock 18110% पेक्षा जास्त वाढला आहे. 

(Disclaimer : येथे केवळ स्टॉकच्या performance ची माहिती दिली आहे, तो गुंतवणुकीचा सल्ला नाही. ही झी मीडियाची मते नाहीत. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया तुमच्या एक्सपर्टचा सल्ला घ्या.)