नवी दिल्ली : मुंबई महापालिका ही भ्रष्टाचाराची महागंगा आहे. यात अनेक जण आपले हात धुवून घेत आहेत. दर वर्षी नालेसफाईची कामे हाती घेण्यात येतात. पण या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. हा भ्रष्टाचार एका पक्षाच्या प्रमुख नेत्याच्या आशीर्वादाने सुरु असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमैया यांनी केलाय.
घाटकोपर, हिंदमाता येथे झालेल्या नालेसफाई नंतरही मुंबई पावसात बुडाली. नालेसफाई झाल्याचे दाखविण्यात आले. पण ही सफाई झालीच नाही. ज्यांना या कामाचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले. त्यांचे पैसे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खाल्ले आहेत, असा आरोप त्यांनी केलाय.
त्यांनी भुजबळांनाही मागे टाकले.
मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांची आयकर विभागाकडून चौकशी झाली. या चौकशीतून अनेक बाबी उघड झाल्या आहेत. १०० कोटींची मनी लाॅंड्रींग त्यांनी केलेय. यशवंत जाधव हे उद्धव ठाकरे यांचे शागिर्द आहेत.
भ्रष्टाचाराच्या बाबतीत यशवंत जाधव यांनी छगन भुजबळांनीही मागे टाकलं आहे. प्रधान डीलर्स प्रा. लि. कंपनी २०.१०.२०१२ रोजी स्थापन झाली आणि ३०.१०.२०१२ रोजी या कंपनीबरोबर १५ कोटींचा व्यवहार झाला. हे सगळे उदय शंकर महावार याचा मदतीने झाले असा आरोप त्यांनी केला.
उदय शंकर हा गांधी कुटूंबाच्या जवळचा व्यक्ती आहे. काही लाख रुपये मोजून ही कंपनी नंतर जाधव कुटूंबाच्या नावावर झाली. मागे उद्धव ठाकरे हे सोनिया गांधींकडे गेले होते. यावेळी ५०० कोटींचा मनी लाॅंड्रींगचा व्यवहार झाल्याचा आरोप करतानाच यामागे ऊदय शंकर महावार हे सुत्रधार असल्याचे सोमैया म्हणाले.
पवार हे हुशार नेते
नवाब मलिकांवर कुठले आरोप आहेत, यात टेरर फंडींग आहे हे शरद पवार यांना चांगलेच माहित आहे. ही चौकशी अधिकच लांबणार आहे. त्यामुळे पवार यांनाही भीती वाटत आहे. पवार यांचे दाऊदशी संबंध असल्याचा आरोपही झाला होता. त्यामुळे त्याची मुळे कुठे आहेत हे सांगण्याची गरज नाही. ठाकरे सरकारमध्ये अनेक घोटाळेबाज नेते आहेत. मात्र, ठाकरे यांना जनतेची नाही तर त्यांच्या खुर्चीची काळजी असल्याचा टोलाही सोमैया यांनी लगावला.