'हे' आहे भारतातील सर्वात जास्त भयावह ठिकाण; सुर्यास्तानंतर पाय ठेवायची कुणाची बिशाद?

चुकूनही इथे सुर्यास्तानंतर थांबू नका... 

Updated: Jul 9, 2022, 09:08 AM IST
'हे' आहे भारतातील सर्वात जास्त भयावह ठिकाण; सुर्यास्तानंतर पाय ठेवायची कुणाची बिशाद?  title=
this is one of the haunted place in india Bhangarh Fort rajasthan

मुंबई : काही ठिकाणं दिसायला जितकी सुंदर असतात, त्यामध्ये तितकीच गुपितं दडलेली असतात हे मात्र विसरुन चालणार नाही. भारतात अशी अनेक ठिकाणं आहेत. मुख्य म्हणजे या ठिकाणांपैकी काही स्थळांवर तुम्ही फिरूही शकता. अर्थात पर्यटनाचा आनंद घेऊ शकता. पण, तिथेही काही नियमांचं पालन करणं महत्त्वाचं आहे. (this is one of the haunted place in india Bhangarh Fort rajasthan )

अशाच ठिकाणांमध्ये एका 400 वर्षे जुन्या किल्ल्याचाही समावेश आहे. भानगड असं या किल्ल्याचं नाव. 17 व्या शतकात माधो सिंह यांनी धाकटे चिरंजीव मान सिंग यांच्यासाठी हा किल्ला उभारला होता. इथल्या घरांवर छत नाही, ही बाब इथे आल्यावर लक्ष देण्याजोगी. असं म्हटलं जातं की ही वास्तू शापित आहे. काहींचं असंही म्हणणं आहे की, इथल्या भींतींना कान लावल्यास विचित्र आवाज ऐकू येतात. सुर्यास्तानंतर या किल्ल्यावर कुणालाही थांबता येत नाही. 

काय आहे कहाणी ? 
किल्ला जिथं उभा आहे, तिथं गुरू बालूनाथ नावाच्या थोर तपस्वींचा वास होता. किल्ल्याचं बांधकाम सुरु होण्यापूर्वी तिथं माधो सिंह यांनी या तपस्वींची अनुमतीही मागितली होती. किल्ल्याची सावली कधीही आपल्या घरावर पडणार नाही, या एका अटीवर बालूनाथांनी बांधकामास परवानगी गिली. पण, उत्तराधिकारी अजब सिंह यांनी या अटीकडे दुर्लक्ष करत किल्ला भक्कम तटबंदींसह बांधून घेतला आणि त्याची सावली तपस्वींच्या घरावर गेली. परिणामी भानग़डचा संपूर्ण परिसर उध्वस्त झाला, असं ऐकिवात आहे. 

भानगड किल्ल्याचं भकास असणं या भूताटकीच्या गोष्टींमध्ये भर टाकतं. काहींनी इथं आपल्याला भास झाल्याचंही म्हटलं आहे. पण, पर्यटनाचा भार म्हणून मात्र हा किल्ला अनेकांच्याच कुतूहलाचा भाग ठरत आहे. 

किल्ल्याचे अवशेष आणि तिथला एकंदर परिसर पाहता नकळत जाणवणारी शांतताही मनात काहीशी भीती निर्माण करुन जाते. त्यातच बऱ्याच गोष्टी कानांवर पडल्यामुळंही किल्ला अनेकदा अंगावर येतो. पण, पर्यटनाच्या निमित्तानं का असेना, या किल्ल्याला एकदातरी भेट द्या. अर्थात सदर परिसराचं महत्त्वं आणि तिथल्या सर्व नियमांचं पालन करुन.