How To Make Noodles In Factory: स्ट्रीट फुड हा प्रकार सध्या चर्चेत आला आहे. स्वस्त्यात मस्त ही स्ट्रीट फुडची खासियत आहे. मुंबई व दिल्लीच्या खाऊ गल्लीत मिळणारे पदार्थ हे लोकप्रिय झाले आहेत. तसंच, इन्स्टाग्रामवरील फुड ब्लॉगरच्या व्हिडिओमुळंही अनेक स्ट्रीट फुड चर्चेत आले आहेत. त्यातील सर्वात आवडीने व चवीने खाल्ले जाणारे फुड म्हणजे चाऊमीन. गाजर, कोबी, सिमला मिरचीसारख्या भाज्या वापरुन बनवले जाणारे न्यूडल्स चविष्ट तर लागतातच. पण तुम्हाला माहितीये का? चाऊमीनसाठी वापरले जाणारे न्यूडल्स कसे बनवले जातात.
न्यूडल्स फक्त उकडवून त्यापासून चाऊमीन करण्यात येतात असंच तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहेत. न्यूडल्स बनवण्याची प्रक्रिया ही फार मोठी आहे. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यात न्यूडल्स बनवण्याची प्रक्रिया पूर्णपणे दाखवण्यात आली आहे. इन्स्टाग्रामवर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत असून तो कोलकत्ता येथील आहे. फॅक्ट्रीत कशाप्रकार न्यूडल्स बनवले जातात हे पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. कारण या व्हिडिओतून अनेक खुलासे झाले आहेत.
व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, न्यूडल्सच्या फॅक्ट्रीत मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दिसून येत आहे. न्यूडल्सवर प्रक्रिया करत असताना कर्मचारी कोणत्याही प्रकारची काळजी घेताना दिसत नाहीयेत. कामगारांच्या हातात मोजेवगैरेही दिसत नाहीयेत. खाद्य सुरक्षेच्या नियमांना पूर्णपणे दुर्लक्ष केलेले दिसत आहे.
न्यूडल्स बनवण्यात येणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आत्तापर्यंत 3.2 मिलियनहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. हजारो फुड लव्हर्सनी फॅक्ट्रीत असलेल्या अस्वच्छतेबाबत प्रतिक्रिया दिली आहे. तसंच, याबाबत चिंतादेखील व्यक्त केली आहे. अनेकांनी न्यूडल्स बनवण्याच्या या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहे. तर, दुसऱ्या एका व्यक्तीने या प्रोडक्टला फुट फंगस-फ्लेवर्ड चाउमीन असं म्हटलं आहे.