बंगळुरु : कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा बहुमत मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. काँग्रेसकडे 78 तर जेडीएसकडे 38 जागा आहे. येदियुरप्पा यांना 111 आमदारांचा पाठिंबा हवा आहे. प्रोटेम स्पीकर तेव्हाच मत टाकू शकता जेव्हा दोन्हीकडे समान मतं असतील. 104 जागा मिळालेल्या भाजपला सत्ता स्थापनेसाठी आणखी 7 आमदारांचा पाठिंबा हवा आहे. भाजपला विश्वास मत मिळो अथवा न मिळो या शक्यता त्यांना मदत करु शकतील.
1 : भाजपला जर काँग्रेस/जेडीएसच्या 7 आमदारांचा पाठिंबा मिळाला तर या 7 आमदारांना पक्ष बदलल्याच्या कायद्याचा सामना करावा लागेल.
2 : येदियुरप्पा यांच्या बहुमत चाचणी अगोदर जर काँग्रेस/जेडीएसच्या 14 आमदारांनी राजीनामा दिला तर यामुळे आमदारांची संख्या 206 होर्ईल आणि बहुमतासाठी 104 हा बहुमताचा आकडा असेल. या प्रकियेत या आमदारांची आमदारकी रद्द होऊ शकते त्यानंतर पुन्हा ते भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवू शकतील.
3 : सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष दोन्ही पक्षांमध्ये विश्वास कायम आहे. अशात जर विधानसभेचं वातावरण बिघडलं तर गव्हर्नर हाउसला सस्पेंशन मोडमध्ये ठेवतील.
4 : काँग्रेस-जेडीएस विश्वास मत मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. भाजप देखील जुळवाजुळवी करण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न करत आहे.
5 : जर येदियुरप्पा विश्वास मत जिंकण्यात यशस्वी ठरले आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला तर त्यांना भावनिक साथ मिळेल. यानंतर 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचं पारडं मजबूत होईल. 2007 मध्ये देखील येदियुरप्पा यांना 7 दिवसात राजीनामा द्यावा लागला होता.