1 सप्टेंबरपासून होणार 'हे' मोठे बदल

याचा तुमच्या महिन्याच्या बजेटवर फरक पडू शकतो. 

Updated: Aug 29, 2020, 03:42 PM IST
1 सप्टेंबरपासून होणार 'हे' मोठे बदल  title=

नवी दिल्ली : कोरोना काळात अनलॉक-4 अंतर्गत 1 सप्टेंबरपासून काही मोठे बदल होणार आहेत. ईएमआय, गॅस सिलेंडर, आधार कार्ड, जीएसटी यात काही बदल होणार असू याचा तुमच्या महिन्याच्या बजेटवर फरक पडू शकतो. 

लोन मोराटोरियम EMI Moratorium -

बँकांकडून कर्ज घेतलेल्यांना आता, आपल्या कर्जाचे हप्ते नियमित भरावे लागणार असल्याची शक्यता आहे. कोरोना काळात देण्यात आलेली  EMI Moratorium सुविधा पुढे न वाढवण्याचा निर्णय आरबीआयकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. कोरोना काळात कर्जाच्या हप्त्यांवर सहा महिन्यांची सूट देण्यात आली होती. हा कालावधी 31 ऑगस्ट रोजी संपणार आहे. 

Fastag

24 तासात कोणत्याही ठिकाणाहून परत आल्यास टोल टॅक्समध्ये केवळ Fastag असणाऱ्या गाड्यांनाच सूट मिळणार आहे. 

आधारकार्ड

यूआयडीएआयने दिलेल्या माहितीनुसार, आता आधारकार्डमध्ये एक किंवा त्याहून अधिक अपडेट करण्यासाठीचे शुल्क 100 रुपये असणार आहे, ज्यात बायोमॅट्रिक्स अपडेटचाही समावेश आहे. आतापर्यंत आधारकार्डमध्ये डेमोग्राफिक डिटेल अपडेट करण्यासाठी 50 रुपये शुल्क होतं. 

विमान प्रवास 

नागरी उड्डाण मंत्रालयाने, 1 सप्टेंबरपासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांकडून सुरक्षा शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. एएसएफ फी म्हणून देशांतर्गत प्रवाशांकडून आता 150 ऐवजी 160 रुपये आकारले जातील. तर आंतरराष्ट्रीय प्रवाशांकडून 4.85 डॉलरच्याऐवजी 5.2 डॉलर आकरले जातील.

इंडिगो 

इंडिगोने आपली उड्डाणे टप्प्या-टप्प्याने सुरु करण्याची घोषणा केली आहे. 1 सप्टेंबरपासून प्रयागराज, कोलकत्ता आणि सूरतसाठी उड्डाणं सुरु होणार आहेत. भोपाळ-लखनऊ मार्गावर कंपनीकडून 180 आसन व्यवस्था असणारी एयर बस-320 चालवण्यात येणार आहे. सोमवार, बुधवार आणि शुक्रवार अशी आठवड्यातून तीन वेळा ही सेवा देण्यात येणार आहे.

टोल टॅक्स 

रस्ते वाहतूकीदरम्यान 1 सप्टेंबरपासून टोल प्लाजावर अधिक रक्कम भरावी लागू शकते. सरकार टोल टॅक्सच्या किंमतीत 5 ते 8 टक्के वाढ करणार असल्याची माहिती आहे. यामध्ये खासगी आणि व्यवसायिक वाहनांना वेग-वेगळ्या टोल टॅक्सप्रमाणे टोल भरावा लागेल.

जीएसटी 

जीएसटी भरण्यास विलंब झाल्यास 1 सप्टेंबरपासून संपूर्ण कर देयकावर व्याज आकारलं जाणार आहे. 

एलपीजी 

तेल मार्केटिंग कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलेंडरच्या आणि विमान इंधनाच्या किंमती जाहीर करतात. गेल्या काही महिन्यांपासून या किंमतीत वाढ होत आहे. 1 सप्टेंबरपासून एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.