Schemes for farmers | शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या 5 महत्वपूर्ण योजना; वाचा सविस्तर

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये शेतीपासून ते घरापर्यंतच्या योजना आहेत. योजनांचा शेतकऱ्यांचा चांगला लाभ मिळू शकतो. 

Updated: Sep 11, 2021, 10:31 AM IST
Schemes for farmers | शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या 5 महत्वपूर्ण योजना; वाचा सविस्तर title=

नवी दिल्ली : केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये शेतीपासून ते घरापर्यंतच्या योजना आहेत. योजनांचा शेतकऱ्यांचा चांगला लाभ मिळू शकतो. सरकारी मदतीतून मिळणारी आर्थिक रक्कम थेट  खात्यांमध्ये जमा केली जाते. ज्यामुळे शेतकऱ्यांना केंद्र सरकारपासून थेट मदत मिळते. सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या 5 योजनांची माहिती घेऊ य़ा! (Central  Government Scheme for  Farmers)

पंतप्रधान किसान सम्मान निधी योजना
पंतप्रधान किसान सम्मान निधी योजना (PM KISAN)च्या अंतर्गत सरकार छोट्या शेतकऱ्यांना 1 वर्षात 3 हफ्त्यामध्ये 6000 रुपयांची मदत देते. प्रत्येक हफ्त्याला शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांची रक्कम थेट खात्यात जमा केली जाते. ही योजनेचा लाभ लहान आणि सिमांत शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना ज्यांच्याकडे 2 हेक्टरपर्यंत शेतजमिनीची मालकी आहे ते घेऊ शकतात. त्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिसच्या CSC काऊंटर्सवर नोंदणी करू शकता. 

किसान क्रेडिट कार्ड
किसान क्रेडिट कार्ड केंद्र सरकारची अशी योजना आहे ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना गरज पडल्यास कर्ज मिळते. त्याचा उद्देश शेतकऱ्यांना वेळेवर कमी कालावधीसाठी कर्ज देणे होय. त्याची सुरूवात नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर ऍंड रुरल डेवलपमेंट (NABARD)ने केली होती. पंतप्रधान किसान क्रेडिट कार्ड आता पंतप्रधान किसान सम्मान निधी योजनेसोबत लिंक करण्यात आली आहे. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज 4 टक्के व्याजाने घेता येते. तसेच सम्मान निधीच्या लाभार्थ्यांना क्रेडिट कार्डसाठी अप्लाय करणे सोपे होते.

पंतप्रधान पिक विमा योजना
पाऊस, वादळ, अतिवृष्टी, भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होते. अशावेळी त्यांना दिलासा देण्यासाठी पंतप्रधान पिक विमा योजनेची सुरूवात करण्यात आली होती. पिक विमा योजनेअंतर्गत विम्याची रक्कम आता 40 हजार 700 रुपये करण्यात आली आहे. यामध्ये पिकांच्या लागवडीपासून ते पिकांच्या पूर्ण वाढीपर्यंत पिकांचे पूर्ण चक्र सामिल आहे. ज्यामध्ये पिकांवर कोणत्याही प्रकारच्या रोगराईमुळे होणाऱ्या नुकसानाचाही सहभाग आहे.

पंतप्रधान जनधन योजना (Pradhan Mantri Jan Dhan Yojana)
पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत गरीबांचे शुन्य रकमेवर बॅंक, पोस्ट ऑफिसमध्ये उघडले जाते. सरकारच्या सर्वात महत्वकांशी वित्तीय योजनांपैकी एक आहे. त्याअंतर्गत गरीब व्यक्ती आपले बँक खाते सहजरित्या सुरू करू  शकतो. योजनेअंतर्गत बँक खाते सुरू करणाऱ्या खातेधारकाला 1 लाख रुपयांपर्यंतचा अपघात विमा आणि 30 हजार रुपयांपर्यंतचा सामान्यव विमा मिळतो.

पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण)
योजनेचा उद्देश ग्रामी क्षेत्रांमध्ये 2022 पर्यंत जास्तीत जास्त कुटूंबियांना पक्के घर बांधून देणे आहे. ज्या कुंटूंबांकडे स्वतःचे घर नाही किंवा ग्रामीण परिसरांमध्ये पडके घर आहे, ते या स्किमसाठी अर्ज करू शकतात. या योजनेअंतर्गत तुम्ही 6 लाखांचे कर्ज 6.5 टक्के व्याजदराने घेऊ शकता.