आवरा! बोगदा खोदून चोरट्यांनी पळवलं रेल्वे इंजिन; घटना तुम्हाला हैराण करेल

चोरट्यांचा पराक्रम; रेल्वेचं इंजिन (Railway Engine) चोरण्यासाठी बोगदा खोदला आणि....  

Updated: Nov 25, 2022, 06:50 PM IST
आवरा! बोगदा खोदून चोरट्यांनी पळवलं रेल्वे इंजिन; घटना तुम्हाला हैराण करेल title=
The thieves stole the bihar railway engine by digging a tunnel The incident will surprise you nz

Bihar Engine Theft Case : सध्या भारतातील (India) वातावरण पाहिल्यास गुन्हेगारीच्या (criminality) प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे. असाच एक गुन्हा बिहारमध्ये (Bihar) घडला आहे. आपण नेहमीच पूल (Bridge), रेल्वे इंजिन (Railway Engine) चोरीच्या घटनांच्या बातम्या वाचतो पण ही घटना मात्र वेगळी आहे आणि धाडसी सुद्धा आहे. येथे चोरट्यांनी (Theft) रेल्वेचे इंजिन (Railway Engine) चोरण्यासाठी बरौनी ते मुजफ्फरपूर असा बोगदा (tunnel) खोदला. गेल्या आठवड्यात एका टोळीने बरौनी येथील गरहारा यार्डमध्ये दुरुस्तीसाठी आणलेल्या ट्रेनचे संपूर्ण डिझेल इंजिन चोरून नेले. या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, दरोडेखोरांच्या टोळ्या बिहारमध्ये डिझेल आणि जुन्या ट्रेनचे इंजिन आणि स्टीलचे पूल चोरत आहेत. यामुळे पोलिसांची झोप उडाली आहे.

बोगद्यातून चोरी करायची

बिहार पोलिसांना रेल्वेचे इंजिन हरवल्याची बातमी मिळताच पोलिसांनी 3 जणांना अटक केले. त्यांची चौकशी केल्यानंतर, पोलिसांनी मुझफ्फरपूरच्या प्रभात कॉलनीमध्ये असलेल्या एका भंगार गोदामातून इंजिनच्या भागांच्या 13 गोण्या जप्त केल्या. आश्‍चर्यकारक गोष्ट म्हणजे बरौनी स्टेशनपासून मुझफ्फरपूरपर्यंत यार्डाजवळ एक बोगदा सापडला आहे. या बोगद्यातून चोरटे ये-जा करत इंजिनचे पार्ट चोरायचे असे पोलिसांनी सांगितले. या चोरीची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांना नव्हती.

 

अररियामधील पुलाचे भाग गायब

यापूर्वी देखील अशा घटना घडल्या आहेत. या चोरांनी अररियातील फोर्ब्सगंज ते राणीगंजला जोडणाऱ्या पलातानिया पुलावरून काही लोखंडी अँगल आणि पुलाचे इतर महत्त्वाचे भाग चोरले आहेत. फोर्ब्सगंज पोलिस स्टेशनचे प्रभारी निर्मल कुमार यादवंदू यांनी सांगितले की, 'आम्ही पुलाच्या सुरक्षेसाठी एक कॉन्स्टेबल तैनात केला आहे, जेणेकरून पुल सुरक्षित राहील. लोखंडी पुलाचे काही भाग चोरल्याप्रकरणी आम्ही अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

 

पूर्णिया येथेही रेल्वेचे इंजिन चोरीला 

बिहारच्या पूर्णियामध्ये, चोरांनी प्रदर्शनात असलेले संपूर्ण विंटेज स्टीम ट्रेनचे इंजिन चोरून विकले. या घटनेत एका रेल्वे अभियंत्याचाही सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले.