मुंबई : भारतीय रेल्वे (Indian Railway) हे जगातील चौथ्या क्रमांकाचे आणि आशियातील दुसरे सर्वात मोठे रेल्वेचे जाळे आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतात एकूण 8338 रेल्वे स्टेशन आहेत, जी देशभर पसरलेली आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की, आपल्या देशात असे एक रेल्वे स्टेशन आहे, जिथे जाण्यासाठी तुम्हाला व्हिसा आणि पासपोर्ट आवश्यक आहे. जर कोणी व्हिसाशिवाय येथे गेला तर त्याला जेलची हवा खावी लागते.
अटारी (Atari) असे या रेल्वे स्थानकाचे नाव आहे. आता हे स्टेशन अटारी श्याम सिंह स्टेशन (Atari Shyam Singh) या नावाने ओळखले जाते. येथे जाण्यासाठी पाकिस्तानी व्हिसा अनिवार्य करण्यात आला आहे. गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणांनी चोवीस तास सुरक्षा असते. व्हिसाशिवाय या रेल्वे स्थानकावर पोहोचलेल्या देशातील कोणत्याही नागरिकावर 14 फॉरेन अॅक्ट (व्हिसाशिवाय या रेल्वे स्थानकावर आल्याचा आरोप) अंतर्गत गुन्हा दाखल केला जातो आणि यासाठी जामीन मिळणे खूप कठीण आहे.
देशातील सर्वात व्हीव्हीआयपी ट्रेन समझौता एक्स्प्रेसला या रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवण्यात आला. काश्मीरमधून 370 अनुछेद हटवल्यानंतर समझौता एक्सप्रेस बंद करण्यात आली आहे. हे देशातील पहिले रेल्वे स्थानक आहे जेथे रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी सीमाशुल्क विभागाकडून तसेच ट्रेनमध्ये बसलेल्या प्रवाशांची परवानगी घेतली जाते. या रेल्वे स्थानकावरून प्रत्येक रेल्वे तिकीट खरेदी करणाऱ्याचा पासपोर्ट क्रमांक लिहिला जातो आणि त्यांना कन्फर्म तिकीट मिळते.
अटारी हे पंजाबमधील भारतातील शेवटचे रेल्वे स्टेशन आहे. अमृतसर एका बाजूला आणि लाहोर दुसऱ्या बाजूला. हे स्टेशन तितकं मोठं नाही, मात्र, येथे कडक धोरण अवलंबले जात आहे. रेल्वे बंद झाल्यानंतरही या स्थानकावर काही महत्त्वाची कामे सुरूच आहेत, मात्र तरीही येथे लोकांना सहजासहजी जाऊ दिले जात नाही.