देशात इलेक्ट्रिक वाहन क्षेत्राचे भविष्य उज्वल; रिसर्च रिपोर्टमध्ये महत्वपूर्ण बाबी समोर

 इंडिया रेंटिंग ऍंड रिसर्चच्या दाव्यानुसार सरकारच्या वतीने मिळणाऱ्या सब्सिडीमुळे भारतात e-schooter चा सेल 20-25 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो.

Updated: Oct 10, 2021, 09:58 AM IST
देशात इलेक्ट्रिक वाहन क्षेत्राचे भविष्य उज्वल; रिसर्च रिपोर्टमध्ये महत्वपूर्ण बाबी समोर title=

नवी दिल्ली : इंडिया रेंटिंग ऍंड रिसर्चच्या दाव्यानुसार सरकारच्या वतीने मिळणाऱ्या सब्सिडीमुळे भारतात e-schooter चा सेल 20-25 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो.

भारतात आता लवकरच इलेक्ट्रिक वाहनांचा जमाना सुरू होणार आहे. टु-व्हिलर क्षेत्राचे देशात मोठे मार्केट आहे. परंतु पेट्रोलच्या वाढत्या दरांना पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहनांकडे कल हळु हळु वाढत आहे. इलेक्ट्रिक वाहनांना मिळणाऱे सरकारी प्रोत्साहन तसेच मार्केटमध्ये येणारे नवनवीन मॉडेलमुळे भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक टु व्हिलरची मागणी वाढणार आहे. लवकरच या क्षेत्रात तेजी येणार आहे.

आर्थिक वर्ष 2021 मध्ये एकुणच टु व्हिलर वाहनांच्या विक्रीच्या प्रमाणात e-2Ws ची विक्री एका टक्क्यापेक्षाही कमी राहिली आहे. परंतु आर्थिक वर्ष 2025 पर्यंत विक्रीचे प्रमाण वाढून 7-10 टक्क्यांवर पोहचण्याची अंदाज आहे.

वृत्त संस्था IANSने India Ratings and Research ने दिलेल्या माहितीनुसार e-schooter चा सेल येणाऱ्या काळात 20 ते 25 टक्के वाढण्याची शक्यता आहे.