Marriage : लग्न सोहळा म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील सुखद आणि आनंदाचा क्षण. लग्न सोहळा सुरु असताना नवरदेवाला जबरदस्त झटका बसला. लग्नाचे विधी सुरु होत्या. मात्र, दोन फेरे घेतल्यानंतर नवरी म्हणाला मला हा नवरा नको. लग्नाच्या विधी थांबवण्यात आल्या. अचानक लग्नसोहळा थांबल्याने लग्न मंडपात उप्सथित असलेले वऱ्हाडी गोंधळे. नवरीने लग्न का मोडले याचे कारण समजल्यावर वऱ्हाड्यांनी डोक्याला हात लावला. बिहारमध्ये हा अजब लग्न सोहळा पार पडला.
भटजी मंगलाष्टका बोलत असताना नवरीने त्यांना थांबवले. मला हे लग्न करायचे नाही असे म्हणत नवरीने लग्न मोडले. नवरीचे आई, वडिल आणि तिच्या नातेवाईकांनी तिला खूप समजावले. तसेच मुलाकडील मंडळींनी देखील पुन्हा लग्न करण्यास विनवण्या केल्या. मात्र, नवरीने लग्न करणार नाही असे सांगितले.
नवरदेव बोहल्यावर चढला होता. मात्र, ऐनवेळी नवरीने लग्नाला नकार दिल्याने या नवरदेवाची लग्न मंडपात मोठी फजिती झाली. नवरीने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे लग्न मोडले. नवरदेवाचे स्वप्न भंगले. मुलाच्या आई वडिलांची देखील नाचक्की झाली.
विधी सुरु असताना नवरीने लग्न मोडल्याने लग्न मंडपात एकच गोंधळ उडाला. वधु पक्षाच्या मंडळीने नवरीने अचानक घेतलेल्या भूमिकेमुळे एकच गोंधळ घातला. वधु आणि वर पक्षामध्ये प्रचंड बाचाबाची झाली. अखेरीस हे प्रकरण पोलिस ठाण्यात पोहचले. पोलिसांनी नवरीला समजवण्याच्या प्रयत्न केला. मात्र, नवरी लग्न करण्याच्या भूमिकेवर ठाम राहिली. अखेरील पोलिसांनी वधु आणि वर पक्षाच्या मंडळींना हा विषय समजुतीने सोडण्याच्या सूचना केल्या.
नवरदेव गळ्यात वरमाला घालणार इतक्यात नवरीने हे लग्न थांबवले. मला या मुला सोबत लग्न करायचे नाही. लग्न थांबवा असे या नवरीने भटजीला सांगितले. नवरीचे बोलणे एकूण भटजीसह लग्न मंडपात उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले. लग्न मोडण्यामागचे कारण नवरीला विचारले असता तिचे उत्तर ऐकून सगळ्यांनी डोक्याला हात लावला. मुलगा काळा आहे असे कारण या नवरीने दिले. नवरा मुलगा काळा आहे म्हणून नवरीने लग्न मोडले. नवरी मुलीचे कुठे तरी अफेअर असावे म्हणून तिने लग्न मोडल्याचा आरोप नवरदेवाच्या नातेवाईकांनी केला आहे.