जेडीएसच्या आमदारास शंभर कोटींची ऑफर दिल्याचा भाजपावर आरोप

 भाजपनं जेडीएसचे आमदार रेवण्णा यांना शंभर कोटी आणि मंत्रिपदाची ऑफर दिल्याचा आरोप कुमारस्वामी यांनी केलाय

Updated: May 17, 2018, 08:18 AM IST
जेडीएसच्या आमदारास शंभर कोटींची ऑफर दिल्याचा भाजपावर आरोप title=

कर्नाटक : कर्नाटकात सत्तास्थापनेसाठी भाजप सौदेबाजी करत असल्याचा आरोप जेडीएसनं केलाय.  भाजपनं जेडीएसचे आमदार रेवण्णा यांना शंभर कोटी आणि मंत्रिपदाची ऑफर दिल्याचा आरोप कुमारस्वामी यांनी केलाय.रेवण्णा हे एच. डी. देवेगौडा यांचे चिरंजीव आहेत. त्याचबरोबर भाजपबरोबर जाण्याचा प्रश्नच येत नाही, असं सांगत जेडीएसच्या कुमारस्वामींनी भाजपबरोबर सत्तास्थापनेची शक्यता फेटाळून लावलीय... त्याचबरोबर मोदी अनैतिक पद्धतीनं राज्यपालांवर दबाव टाकण्याची भीती आहे, असंही कुमारस्वामी म्हणाले.

आमदार अज्ञातस्थळी 

 काँग्रेस आणि जेडीएसनं आमदार फुटण्याच्या भीतीनं सावध पवित्रा घेतलाय. काँग्रेस आपल्या आमदारांना अज्ञातस्थळी रवाना केलंय.  तर जेडीएसच्या सर्व आमदारांना शांग्रिला हॉटेलमध्ये ठेवण्यात आलंय. भाजपकडून आमदारांची सौदेबाजी सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते अशोक गेहलोत यांनी केलाय. कर्नाटकात सत्तेचा घोडेबाजार तेजीत आल्याचं यावरून दिसतंय. भाजपला बहुमतासाठी आठ आमदारांची गरज आहे. त्यामुळे ते काँग्रेस किंवा जेडीएसच्या आमदारांशी संपर्क साधत असल्याचं पुढं आलंय. भाजपच्या गळाला आपले आमदार लागू नयेत यासाठी काँग्रेस आणि जेडीएसनं खबरदारी घेतलीय.