सेनेची मोठी कारवाई, दहशतवादी मसूद अजहरच्या भाच्याचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सोमवारी रात्री मोठी कारवाई करत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. यात एक जवानही शहीद झाला.

Updated: Nov 7, 2017, 11:53 AM IST
सेनेची मोठी कारवाई, दहशतवादी मसूद अजहरच्या भाच्याचा खात्मा  title=

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सोमवारी रात्री मोठी कारवाई करत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. यात एक जवानही शहीद झाला.

ठार करण्यात आलेल्या तीन दहशतवाद्यांमध्ये कुख्यात दहशतवादी मसूद अजहर याचा भाचा तल्हा रशीद याचाही समावेश आहे. या चकमकीतून सुरक्षा रक्षकांनी दहशतवाद्यांकडून अमेरिकेत तयार करण्यात आलेली M4 कार्बाइन ताब्यात घेतली आहे. ही रायफल काही दिवसांपूर्वी सोशल मीडियात व्हायरल झाली होती. 

सुरक्षा रक्षकांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, हे हत्यार पाकिस्तानी सेना वापरतात आणि ही शक्यता आहे त्यांनी हे हत्यारं दहशतवाद्यांना दिले असतील. त्यानंतर आर्मी चीफ म्हणाले की, आम्हाला दहशतवाद्यांच्या पृष्ठभूमिचं काही देणंघेणं नाही. आमचं लक्ष्य हे दहशतवादाचा खात्मा करणं आहे.

मुनीर खान आयपीजी काश्मीर यांनी सांगितले की, दहशतवाद्यांकडून ताब्यात घेण्यात आलेल्या M4 कर्बाइनचा वापर पाक सेना करते. ही एक कर्बाइन रायफल आहे. दहशतवाद्यांकडे हे हत्यार कसे आले याचा आम्ही तपास करत आहोत. हे हत्यार वापरण्यात कठिण असतं. पहिल्यांदाच त्यांनी पाकिस्तानी दहशतवादी असण्याचं मान्य केलं. त्यात मसूद अजहरचा भाचाही आहे.