बीएसएफ कॅम्पवर हल्ला, तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू काश्मीरच्या श्रीनगरच्या बीएसएफ कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आलं. श्रीनगर विमानतळाजवळ हा दहशतवादी हल्ला झालाय. दहशतवाद्यांनी बीएसएफच्या कॅम्पला लक्ष्य केलं. 

Updated: Oct 3, 2017, 04:12 PM IST
बीएसएफ कॅम्पवर हल्ला, तीन दहशतवाद्यांना कंठस्नान title=

श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या श्रीनगरच्या बीएसएफ कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आलं. श्रीनगर विमानतळाजवळ हा दहशतवादी हल्ला झालाय. दहशतवाद्यांनी बीएसएफच्या कॅम्पला लक्ष्य केलं. 

बीएसएफच्या 182 बटालियनवर हा हल्ला करण्यात आला. पहाटे साडेचारच्या सुमारास हा हल्ला झाला. चार ते पाच दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. दहशतवाद्यांनी यावेळी अंदाधुंद गोळीबार केला. दहशतवाद्यांच्या या हल्ल्याला भारतीय जवानांनी जशास तसं उत्तर दिलं. 

या कारवाईत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. तर हल्ल्यात बीएसएफचे एएसआय बी.के. यादव यांना वीरमरण आलंय. तीन जवान जखमी झाले. या हल्ल्यानंतर श्रीनगर विमानतळ आणि हायवे बंद करण्यात आला. या विमानतळावरुन सकाळची सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली.