गूगल डूडलच्या माध्यमातून शिक्षकदिनाचे सेलिब्रेशन

गुरू शिवाय कोणतीच गोष्ट साध्य करणं शक्य नाही. त्यामुळे केवळ शाळा, महाविद्यालय नव्हे तर तर संगीत, कला, खेळ अशा विषयांमध्येही नैपुण्य मिळवण्यासाठी गुरूची गरज असते. ज्ञानार्जनाचे महत्त्वपूर्ण काम करणार्‍या 'गुरू'रूपी व्यक्तीला मानवंदना देण्यासाठी शिक्षकदिन साजरा  केला जातो. 

Updated: Sep 5, 2017, 12:41 PM IST
गूगल डूडलच्या माध्यमातून शिक्षकदिनाचे सेलिब्रेशन  title=

  मुंबई : गुरू शिवाय कोणतीच गोष्ट साध्य करणं शक्य नाही. त्यामुळे केवळ शाळा, महाविद्यालय नव्हे तर तर संगीत, कला, खेळ अशा विषयांमध्येही नैपुण्य मिळवण्यासाठी गुरूची गरज असते. ज्ञानार्जनाचे महत्त्वपूर्ण काम करणार्‍या 'गुरू'रूपी व्यक्तीला मानवंदना देण्यासाठी शिक्षकदिन साजरा  केला जातो. 

 भारतामध्ये 5 सप्टेंबर रोजी शिक्षकदिन साजरा केला जातो. पूर्व राष्ट्रपती डॉ. राधाकृष्ण सर्वपल्ली यांचा जन्मदिवस 'शिक्षकदिन' म्हणून साजरा केला जातो. आजच्या डिजिटल युगात 'गुगल'ही कळत नकळत शिक्षकाची भूमिका निभावत आहे. यंदाच्या शिक्षकदिनी गूगलनेही एका खास अंदाजामध्ये शिक्षकदिन साजरा करण्यासाठी गुगल डूडल बनवले आहे. 

 यामध्ये g हे अक्षर शिक्षकाच्या भूमिकेत आहे. ते अन्य अक्षरांना काही धडे देत आहे. अशा स्वरूपात हे डूडल आज गूगलच्या होमपेजवर झळकत आहे.  

 नरेंद्र मोदींचे खास ट्विट 

 भारतात पूर्व राष्ट्रपती राधाकृष्ण सर्वपल्ली यांच्या जन्मदिनी शिक्षकदिन साजरा केला जातो. त्यांच्या कार्याचे स्मरण ठेवत शिक्षकांच्या कामाला अभिवादन करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट केले आहे.