Tea Powder : चहाप्रेमींसाठी वाईट बातमी, चहापत्ती महागण्याची शक्यता

आता चहाप्रेमींसाठी वाईट बातमी समोर आली आहे. चहापत्ती (Tea Powder) महागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.   

Updated: Sep 27, 2022, 11:52 PM IST
Tea Powder : चहाप्रेमींसाठी वाईट बातमी, चहापत्ती महागण्याची शक्यता  title=
प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई : चहाशिवाय (Tea) अनेकांच्या दिवसाची सुरुवात होत नाही. अनेकांना सकाळी चहा हवाच असतो. मात्र आता चहाप्रेमींसाठी वाईट बातमी समोर आली आहे. चहापत्ती (Tea Powder) महागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तज्ज्ञांनी हा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे येत्या काळात चहा पिण्यासाठी सर्वसामान्यांना अधिकचे पैसे मोजावे लागू शकतात. (tea powder will increase by an average of Rs 80 per kg says experts) 

चहापत्तीचे किलोमागे सरासरी 80 रुपये वाढतील, असं तज्ज्ञांनी सांगितलंय. श्रलंकेत गेल्या काही दिवसांपूर्वी राजकीय संकट ओढावलं होतं. त्यामुळे अनेकांचे खाण्यापिण्याचे वांधे झाले होते. श्रीलंकेतील हीच राजकीय परिस्थिती चहा पावडर महागण्याचं कारण ठरलंय. श्रीलंकेतील या स्थितीमुळे चहा निर्यातीवर परिणाम झालाय. तसेच भारतातील चहा उद्योगावरही परिणाम होत आहे.