टाटा टेक्नोलॉजी IPO मध्ये पैसे लावणं फायद्याचं की तोट्याचं? एक्सपर्ट्सचे मत जाणून घ्या

Tata Technologies IPO: टाटा टेक्नोलॉजी आयपीओमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे आहे की तोट्याचे? यावर एक्सपर्टचे मत काय? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Pravin Dabholkar | Updated: Nov 17, 2023, 01:06 PM IST
टाटा टेक्नोलॉजी IPO मध्ये पैसे लावणं फायद्याचं की तोट्याचं? एक्सपर्ट्सचे मत जाणून घ्या  title=

Tata Technologies IPO: टाटा टेक्नोलॉजी आयपीओ 22 नोव्हेंबरला येत आहे.  तब्बल 19 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर रतन टाटा कंपनीचा IPO बाजारात येत आहे. सध्या IPO साठी प्राइस बँड देखील निश्चित करण्यात आला आहे. एका लॉटसाठी गुंतवणूकदारांना किती पैसे खर्च करावे लागतील? या आयपीओमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे आहे की तोट्याचे? यावर एक्सपर्टचे मत काय? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

अभियांत्रिकी आणि उत्पादन विकासाशी संबंधित डिजिटल सेवा पुरवणारी कंपनी टाटा टेक्नॉलॉजीजने IPO साठी प्रति शेअर 475-500 रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला आहे. हा आयपीओ 22 नोव्हेंबर 2023 सुरु होणार असून 24 नोव्हेंबर 2023 ला खरेदी बंद होणार आहे. यासाठी गुंतवणूकदारांना 14 हजार 250 रुपये गुंतवावे लागतील. याचा प्राइस बँड 475-500 रुपये असून लॉट साइज 30 शेअर्सची आहे. 

कंपनीचा IPO 22 नोव्हेंबरला बोलीसाठी उघडेल आणि 24 नोव्हेंबरला बंद होईल. अँकर गुंतवणूकदार 21 नोव्हेंबरला बोली लावू शकतील. IPO अंतर्गत, टाटा मोटर्स 11.4 टक्के हिस्सा विकेल, खाजगी इक्विटी फर्म अल्फा टीसी होल्डिंग्स 2.4 टक्के हिस्सा विकेल आणि टाटा कॅपिटल ग्रोथ फंड-1 1.2 टक्के हिस्सा विकणार आहे. 

कंपनी काय काम करते?

टाटा टेक्नोलॉजी कंपनी 33 वर्षांपूर्वी स्थापन झाली असून इंजीनीअरिंग आणि डिजिटल सेवांच्या व्यवसायात आहे. या व्यतिरिक्त, कंपनी ऑटोमोटिव्ह, औद्योगिक अवजड यंत्रसामग्री आणि एरोस्पेस क्षेत्रांना देखील सेवा प्रदान करते.  Cyient, Infosys, KPIT Technologies, Persistent हे या कंपनीचे स्पर्धक आहे.

19 वर्षांपूर्वी आला होता आयपीओ

टाटा टेक्नॉलॉजीज आयपीओद्वारे बाजारातून सुमारे 4,000 कोटी रुपये उभे करू शकते. टाटा समूह जवळपास 19 वर्षांनंतर IPO घेऊन येत आहे. यापूर्वी टाटा समूहाचा आयपीओ 2004 साली आला होता. 2004 मध्ये कंपनीने TCS चा IPO आणला होता. त्यामुळे टाटावर विश्वास असणारे गुंतवणूकदार याची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

एक्सपर्टचे मत

टाटा टेकच्या आयपीओची किंमत 475-500 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे. कंपनीचा आयपीओ 22 नोव्हेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल. टाटा टेकच्या आयपीओत टाटा टेकच्या आयपीवर पैसे गुंतवले पाहिजेत असा सल्ला झी बिझनेसचे व्यवस्थापकीय संपादक आणि मार्केट गुरू अनिल सिंघवी यांनी दिला आहे.