Price Hike Alert: टाटा मोटर्सकडून पुन्हा कमर्शिअल वाहनांच्या किंमती वाढवण्याची घोषणा

Price Hike Alert:दिग्गज वाहन कंपनी टाटा मोटर्सने पुन्हा एकदा आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे.

Updated: Jul 1, 2022, 08:15 AM IST
Price Hike Alert: टाटा मोटर्सकडून पुन्हा कमर्शिअल वाहनांच्या किंमती वाढवण्याची घोषणा title=

मुंबई : Price Hike Alert:दिग्गज वाहन कंपनी टाटा मोटर्सने पुन्हा एकदा आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या घोषणेनुसार, पुढील महिन्यात 1 जुलैपासून त्यांची व्यावसायिक वाहने 1.5-2.5 टक्के महाग होतील. वाढलेल्या खर्चामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. टाटा मोटर्सने नियामक फाइलिंगमध्ये ही माहिती दिली आहे. यापूर्वी कंपनीने एप्रिलमध्येही किमती वाढवल्या होत्या.

मॉडेल आणि प्रकारानुसार किंमती वाढतील
रेग्युलेटरी फाइलिंगनुसार, ही वाढ कंपनीच्या सर्व व्यावसायिक वाहनांवर लागू होईल परंतु किती वाढ होईल, ते मॉडेल आणि प्रकारावर अवलंबून असेल. टाटा मोटर्सच्या म्हणण्यानुसार, कंपनीने उत्पादनाच्या विविध टप्प्यांवर उत्पादन खर्चातील वाढीचा मोठा भार उचलण्याचा प्रयत्न केला परंतु तो पुरेसा ठरला नाही. उत्पादन खर्च खूप वाढला आहे, त्यामुळे काही बोजा ग्राहकांवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.

एप्रिलमध्येही कंपनीने वाढवल्या किमती 

टाटा मोटर्सने याआधी एप्रिलमध्येही किमती वाढवल्या होत्या. प्रवासी वाहनांच्या किमतीत सुमारे 1.1 टक्के वाढ झाली आहे. त्याच वेळी, एप्रिलमध्ये टाटा मोटर्सने व्यावसायिक वाहनांच्या किमतीत 2-2.5 टक्के वाढ जाहीर केली होती.