मुंबई : टाटा मोटर्सने एक खास अॅम्ब्युलन्स मॅजिक एक्सप्रेस (Magic Express Ambulance) बाजारात आणली आहे. कंपनीने तिला इकॉनॉमी अॅम्ब्युलन्स विभागात सादर केली आहे. टाटा मोटर्सने कोविड -19 ची परिस्थिती लक्षात घेऊन ही अॅम्ब्युलन्स उपलब्ध करुन दिलेली आहे. या अॅम्ब्युलन्समध्ये रुग्ण आणि चालका व्यतिरिक्त पाच परिचारक एकत्र प्रवास करू शकतात. या अॅम्ब्युलन्समध्ये 800 cc चे TCIC इंजिन आहे, जे 44 HP ची पावर आहे आणि 110 NM चा पीक टॉर्क जनरेट करते. या अॅम्ब्युलन्सची एक्स शोरूममधील (ठाणे) किंमत 8 लाख रुपये आहे.
या अॅम्ब्युलन्समध्ये ऑटो लोडिंग स्ट्रेचर, मेडिकल कॅबिनेट, ऑक्सिजन सिलिंडर, डॉक्टरांच्या बसण्याची व्यवस्था, इंटरनल लाइटनिंगसह फायर एग्झीट, फ्लेम रेसिस्टेंट इंटीरियर आणि अनाउंसमेंट सिस्टम आहे.
अॅम्ब्युलन्सच्या सायरनमध्ये AIS125 प्रमाणित रेट्रो रिफ्लेक्टीव्ह लाइट्स लावण्यात आली आहे. ड्रायव्हर आणि पेशन्ट पार्टिशन घालून विभक्त केलेले आहेत. कोविड -19 पेशंटला नेताना हे पार्टिशन संरक्षण करेल.
टाटा मोटर्सच्या या मॅजिक एक्सप्रेस अॅम्ब्युलन्सला दोन वर्षांची किंवा 72 हजार किलोमीटरची वॅारंन्टी मिळते. टाटा मोटर्सचे उपाध्यक्ष विनय पाठक (प्रॉडक्ट लाईन, SCV & PU) यांच्या वक्तव्यानुसार, 'मॅजिक एक्सप्रेस अॅम्ब्युलन्समुळे टाटा मोटर्स उत्तम आरोग्य मोबिलिटी सोल्यूशनसाठी आपली वचनबद्धता पूर्ण करतात. टाटा मोटर्स गरजा समजून घेण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रासोबत जवळून काम करतात. नवीन सुरुवाती सोबत टाटा मोटर्सने आता परवडणारी, विश्वासार्ह अॅम्ब्युलन्स बाजारात आणली आहे.'
टाटा मोटर्सने सरकारने निश्चित केलेल्या गाईडलाइंन्सनुसार (AIS 125) ही अॅम्ब्युलन्स तयार केली आहे. हे भारतीय रस्ते लक्षात ठेवून तयार केले गेले आहे. यामध्ये आपत्कालीन काळजीच्या सर्व सुविधा देखील आहेत.