Tata Group च्या मल्टीबॅगर स्टॉकवर बंपर रिटर्न्सची शक्यता; राकेश झुनझुनवालांचीही मोठी गुंतवणूक

Tata Group Stock: ब्रोकरेज मॅक्वेरी टायटनवर बुलीश आहे. स्टॉकसाठी आउटपरफॉर्म रेटिंग दिले आहे. टायटन हा स्टॉक दीर्घकाळापासून बाजारातील दिग्गज राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये सामील आहे.

Updated: Jul 7, 2022, 08:28 AM IST
Tata Group च्या मल्टीबॅगर स्टॉकवर बंपर रिटर्न्सची शक्यता; राकेश झुनझुनवालांचीही मोठी गुंतवणूक title=

मुंबई : Tata Group Stock:जागतिक शेअर बाजारांमधील अनिश्चिततेचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारांवरही दिसून येत आहे. तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये दर्जेदार स्टॉक समाविष्ट करायचा असेल, तर तुम्ही टाटा समूहाच्या टायटन कंपनी लिमिटेडच्या शेअरमध्ये गुंतवणूक करू शकतात. 

जागतिक ब्रोकरेज मॅक्वेरी टायटनवर  बुलीश दिसत आहे. यासोबतच आउटपरफॉर्मचे रेटिंग देण्यात आले आहे. हा शेअर बाजारातील दिग्गज राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये दीर्घ काळापासून समाविष्ट आहे. झुनझुनवाला यांची सध्या टायटनमध्ये 5.1 टक्के भागीदारी आहे.

Titan Company: 41% पर्यंत परतावा मिळव्याची शक्यता

जागतिक ब्रोकरेज फर्म मॅक्वेरीने टायटनवर आपले 'आउटपरफॉर्म' रेटिंग कायम ठेवले आहे. तसेच प्रति शेअरची लक्ष्य किंमत 2750 रुपये करण्यात आली आहे. टायटनचा स्टॉक 5 जुलै 2022 रोजी 1954 रुपयांवर बंद झाला. या किमतीसह, भविष्यात स्टॉकमध्ये सुमारे 41 टक्क्यांची तेजी नोंदवू शकतो. टायटन हा गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर स्टॉक आहे. गेल्या पाच वर्षांत या शेअरमध्ये गुंतवणूकदारांना 260 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

टायटनचा शेअर त्याच्या सर्वकालीन उच्चांकावरून सुमारे 29 टक्क्यांच्या कमी किंमतीत व्यवहार करत आहे. टायटनने 21 मे 2022 रोजी रु. 2768 चा विक्रमी उच्चांक गाठला होता. तेव्हापासून, बाजारातील नुकत्याच झालेल्या घसरणीत शेअरही घसरण नोंदवली गेली आहे. स्टॉक 20 जुलै 2021 रोजी 52 आठवड्यांचा नीचांक म्हणजेच 1662 रुपयांवर आला. 

Rakesh Jhunjhunwala यांचा आवडता स्टॉक

दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये Tata Group चा टायटन हा आवडता स्टॉक आहे. मार्च 2022 च्या तिमाही डेटानुसार राकेश झुनझुनवाला आणि असोसिएट्सचे टायटनमध्ये 5.1 टक्के (44,850,970 इक्विटी शेअर्स) आहेत. 

ट्रेंडलाइननुसार, राकेश झुनझुनवाला यांच्याकडे सध्या त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये 33 स्टॉक आहेत, ज्यांची 6 जुलै 2022 पर्यंत एकूण संपत्ती 25,425.9 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे. राकेश झुनझुनवाला हे भारताचे वॉरेन बफे म्हणूनही ओळखले जातात.