Sanjay Raut : त्या 12 खासदारांचे निलंबन करा, संजय राऊत यांची लोकसभा अध्यक्षांकडे मागणी

शिवसेना (Shiv Sena) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील वाद सुरुच आहे.

Updated: Jul 28, 2022, 04:29 PM IST
Sanjay Raut : त्या 12 खासदारांचे निलंबन करा, संजय राऊत यांची लोकसभा अध्यक्षांकडे मागणी title=

रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : शिवसेना (Shiv Sena) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील वाद सुरुच आहे. आता या वादात संघर्षाची आणखी एक ठिणगी पडली आहे. शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदे गटात काही दिवसांपूर्वी सामिल झालेल्या 12 खासदारांचं निलंबन करा, अशी मागणी लोकसभा खासदार ओम बिर्ला (Lok Sabha Spekar Om Birla) यांच्याकडे केली आहे. (suspend 12 mps of eknath shinde group rajya sabha shiv sena mp sanjay raut demands lok sabha speaker om birla)

खासदार राऊत यांनी  लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. राऊतांनी या भेटीत लोकसभा अध्यक्षांना पत्राद्वारे निलंबनाची मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेची साथ सोडत 12 खासदारांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला होता.

दिल्लीत 19 जुलैला दुपारी शिवसेनेच्या 12 खासदारांची ओम बिर्ला यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत ओम बिर्ला यांना राहुल शेवाळे आणि भावना गवळी यांच्या अनुक्रमे गटनेता आणि प्रतोदपदी नियुक्तीबाबत पत्र देण्यात आलं होतं. यानंतर बिर्ला यांनी ग्रीन सिग्नल दिला.

त्यानंतर आता राऊतांनी या 12 खासदारांना निलंबित करण्यासंदर्भात मागणी केली आहे. त्यामुळे आता ओम बिर्ला काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

शिंदे गटाला पाठिंबा असलेले शिवसेनेचे 12 खासदार

राहुल शेवाळे, भावना गवळी, कुपाल तृपाणे, सदाशिव लोखंडे, हेमंत गोडसे, प्रतापराव जाधव, संजय मंडलिक, धैर्यशील माने, हेमंत पाटील,  श्रीरंग बारणे, राजेंद्र गावित आणि डॉ. श्रीकांत शिंदे.