Maharastra Politics : 'प्रत्येक घरात असा भाऊ असतोच...', लोकसभेत सुप्रिया सुळे यांचा अजितदादांवर हल्लाबोल!

Supriya Sule On Ajit Pawar : सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत (Loksabha Speech) चौफेर मुद्द्यांना हात घातल केंद्र सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावर निशाला लावण्याची संधी सोडली नाही. 

Updated: Sep 20, 2023, 06:19 PM IST
Maharastra Politics : 'प्रत्येक घरात असा भाऊ असतोच...', लोकसभेत सुप्रिया सुळे यांचा अजितदादांवर हल्लाबोल! title=
Supriya Sule, Ajit pawar

Womens Reservation Bill Debate : केंद्र सरकारने लोकसभेत मांडलेल्या महिला आरक्षणाच्या (Womens Reservation Bill) विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचं पहायला मिळतंय. महिला आरक्षण बिल लवकरात लवकर पारित व्हावं, अशी मागणी काँग्रेस आणि मित्रक् पक्षांकडून करण्यात आली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लोकसभेत महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं. त्यावेळी लोकसभेतल्या सलग दुसऱ्या भाषणात सुप्रिया सुळे यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर अप्रत्यक्ष हल्लाबोल केला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharastra Politics) मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.

सुप्रिया सुळे यांनी सलग दुसऱ्या दिवशी लोकसभेत भाषण केलं. त्यावेळी त्यांनी चौफेर मुद्द्यांना हात घातल केंद्र सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण.. त्याचबरोबर दुष्काळ आणि कॅनडाच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळे यांनी सरकारला घेरलं. त्यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावर निशाला लावण्याची संधी सोडली नाही. 

नेमकं काय झालं?

महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपकडून एका महिलेने सुरुवात करण्याऐवजी निशिकांत दुबे यांना संधी दिली गेली त्याबद्दल काँग्रेसकडून जेव्हा शेरेबाजी झाली. तेव्हा अमित शाह म्हणाले, महिलांच्या भल्यासाठी केवळ महिलांनीच बोलावं असं नाही,  पुरुषही बोलू शकतातच आम्ही भाऊ म्हणून बोलू शकतो. या वाक्याचा संदर्भ घेत सुप्रिया सुळे यांनी अजितदादांना टोला लगावला आहे. "प्रत्येक घरात असे भाऊ असतातच असे नाही की जे बहिणीचं कल्याण बघतील. प्रत्येकाचं नशीब एवढं चांगलं नसतं", असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

पाहा Video

दरम्यान, भाषणावेळी सुप्रिया सुळे यांनी भाजपाने देखील धारेवर धरलं. एकेकाळी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी मला ऑन कॅमेरा घरी जाऊन जेवण बनवण्याचा सल्ला दिली. ही भाजपची खरी प्रवृत्ती आहे. त्यामुळे भाजपला उत्तरं दिली गेली पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला मतदानाचा अधिकार दिलाय. महात्मा आणि सावित्राबाई फुले यांनी आम्हाला शिक्षणाचा अधिकार दिलाय. माझे वडिल शरद पवार यांनी  पंचायत राजमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण दिलं होतं. या गोष्टीचा आम्हाला अभिमान वाटतो, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.