मुंबई : येत्या ३ डिसेंबरला आकाशात सुपरमून दिसणार आहे. खगोलप्रेमींसाठी ही मोठी संधी असणार आहे.
जेव्हा पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो तेव्हा त्याचा आकार रोजच्या आकारापेक्षा मोठा दिसतो म्हणून त्याला सूपरमून म्हणतात. यंदा चंद्र आकाराच्या १४ पट मोठा दिसणार आहे. तर १६ टक्के त्याचं तेज अधिक असणार आहे. १९७९ मध्ये रिचर्ड नोले यांनी या घटनेला सूपरमून असे संबोधितले.
पौर्णिमेच्या रात्री ९ वाजून १ मिनिटांनी हा सूपरमून पाहता येणार आहे. चंद्र यावेळेस नेहमीपेक्षा मोठा दिसणार आहे. संपूर्ण भारतात हा सूपरमून पाहता येणार आहे. सकाळी ७ वाजून २५ मिनिटांनी पौर्णिमा संपणार आहे. सूपरमूनचं आकर्षण हे अनेक खलोगप्रेमींना आणि विद्यार्थ्यांना असतं. अनेकांसाठी ही पर्वणीच असते.