SUPER EXIT POLL: गुजरात विधानसभा निवडणुकीत फुलणार भाजपचं कमळ

कुठल्या एजन्सी किंवा चॅनलने कुणाला किती जागा मिळणार याचा अंदाज वर्तवलाय याची सर्व माहिती आम्ही तुम्हाला SUPER EXIT POLL मध्ये देणार आहोत.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Dec 14, 2017, 08:12 PM IST
SUPER EXIT POLL: गुजरात विधानसभा निवडणुकीत फुलणार भाजपचं कमळ title=

नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी एक्झिट पोल्सची आकडेवारी समोर आली आहे. कुठल्या एजन्सी किंवा चॅनलने कुणाला किती जागा मिळणार याचा अंदाज वर्तवलाय याची सर्व माहिती आम्ही तुम्हाला SUPER EXIT POLL मध्ये देणार आहोत.

(एक्झिट पोल्सची आकडेवारी पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

विविध चॅनल्सने प्रसिद्ध केलेल्या एक्झिट पोल्सवर नजर टाकली तर भाजप बहुमताजवळ असल्याचं दिसत आहे.

एक्झिट पोल्सनुसार गुजरातमध्ये १८२ जागांपैकी भाजपला १०० जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर, काँग्रेसला ७०-७४ जागा मिळण्याचा अंदाज आहे.

इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार गुजरातमध्ये पुन्हा भाजपचं कमळ फुलणार असल्याचं दिसत आहे. या निवडणुकीत भाजपला ९९ ते ११३ जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर, काँग्रेसला ६८ ते ८२ जागा मिळण्याचा अंदाज आहे. 

चॅनल

भाजप

काँग्रेस

इतर

इंडिया टूडे-AXIS

१०६

७५

ABP न्यूज-CSDSच्या एक्झिट पोलनुसार सौराष्ट्र, दक्षिण गुजरात, उत्तर गुजरात आणि कच्छमध्ये भाजपला अधिक जागा मिळणार असल्याचं दिसत आहे. 
ABP न्यूज-CSDSच्या एक्झिट पोलनुसार १८२ जागांच्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला ११७ जागा, काँग्रेसला ६४ जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

चॅनल

भाजप

काँग्रेस

इतर

ABP-CSDS 

११७

६४

इंडिया टीव्ही-व्हीएमआरच्या एक्झिट पोलनुसार गुजरातमध्ये भाजपला १०९ जागा काँग्रेसला ७० जागा तर इतरांना ३ जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

चॅनल

भाजप

काँग्रेस

इतर

India TV-VMR

१०९ 

७०

तर न्यूज२४-टुडेज चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार भाजपला १३५ जागा, काँग्रेसला ४७ जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

चॅनल

भाजप

काँग्रेस

इतर

न्यूज२४-टुुुुडेज चाणक्य

१३५

४७

एकूणच सर्व एक्झिट पोल्सनुसार, गुजरातमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याचं दिसत आहे.

चॅनल

भाजप

काँग्रेस

इतर

इंडिया टूडे-AXIS 

१०६ 

७५

ABP-CSDS 

११७

६४

India TV-VMR

१०९ 

७०

न्यूज२४-टुुुुडेज चाणक्य

१३५

४७

महा EXIT POLL

११७

६४