हिमाचल SUPER EXIT POLL: भाजपला प्रचंड बहुमत, तर कॉंग्रेसचा सुपडा साफ

SUPER EXIT POLL नुसार हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड बहुमताने सत्ता स्थापन होताना दिसत आहे. सोबतच हिमाचलमध्ये कॉंग्रेसमध्ये पराभूत होताना दिसत आहे.

Updated: Dec 14, 2017, 07:41 PM IST
हिमाचल SUPER EXIT POLL: भाजपला प्रचंड बहुमत, तर कॉंग्रेसचा सुपडा साफ title=

नवी दिल्ली : SUPER EXIT POLL नुसार हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड बहुमताने सत्ता स्थापन होताना दिसत आहे. सोबतच हिमाचलमध्ये कॉंग्रेसमध्ये पराभूत होताना दिसत आहे.

इंडिया टूडे-अ‍ॅक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोलमध्ये हिमाचलमध्ये भाजपला ४७ ते ५५ जागा तर कॉंग्रेसला १३ ते २० जागा मिळताना दिसत आहेत. इतरांच्या खात्यात २ जागा दिसत आहेत. 

हिमाचल प्रदेशमध्ये ७४ टक्के मतदान

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत ५०.२५ लाख मतदारांपैकी ७४ टक्के मतदारांनी मतदान केले. राज्यात एकूण ५० लाख मतदारांमध्ये १९ लाख महिला आहे. तर राज्यात १४ ट्रान्सजेंडर मतदारांनीही मतदानाचा हक्क बजावला. धर्मशालामध्ये सर्वात जास्त १२ उमेदवार रिंगणात आहेत. तर झंडुतामध्ये सर्वात कमी दोन उमेदवार रिंगणात आहेत. 

चॅनल BJP CONG OTHER
इंडिया टूडे-AXIS ४७-५५ १३-२०
न्यूज 24-टुडेज चाणक्य ५५ १३ ००
इंडिया न्यूज-सीएनएक्स ४४-५५ १८-२४
Republic- सी वोटर ६८ ४१

 

इतर पक्षांचे काय?

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मैदानात एकूण ३३७ उमेदवार आहेत त्यात केवळ १९ महिला आहेत. यावेळी ११२ अपक्ष उमेदवार आहेत. इथे मुख्य लढत ही भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात होणार आहे. बहुजन समाज पार्टी ४२ जागांवर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी १४ जागांवर, भारतीय कम्युनिस्ट पार्टी तीन, समाजवादी पार्टी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी दोन-दोन जागांवर लढत आहेत. 

याआधी काय होती स्थिती?

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक २०१२ मध्ये कॉंग्रेसने ४२.८१ टक्के मतांसोबत ३६ जागांवर विजय मिळवला होता. भाजपाने ३८.४७ टक्के मते घेऊन २६ जागां मिळवल्या होत्या. २०१२ मध्ये एकूण ७३.५ टक्के मतदान झालं होतं.