Sukhwinder Singh Sukhu Oath Ceremony: सुखविंदर सिंह यांनी घेतली हिमाचल प्रदेश मुख्यमंत्रीपदाची शपथ

Sukhwinder Singh Sukhu : हिमाचल प्रदेश मुख्यमंत्री म्हणून काँग्रेस नेते सुखविंदर सिंह सुक्‍खू (Sukhvinder Singh Sukhu)यांनी आज शपथ घेतली. ते हिमाचल प्रदेशचे 15वे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झालेत. 

Updated: Dec 11, 2022, 03:36 PM IST
Sukhwinder Singh Sukhu Oath Ceremony: सुखविंदर सिंह यांनी घेतली हिमाचल प्रदेश मुख्यमंत्रीपदाची शपथ  title=

Sukhwinder Singh Sukhu Oath Ceremony: हिमाचल प्रदेश मुख्यमंत्री म्हणून काँग्रेस नेते सुखविंदर सिंह सुक्‍खू (Sukhvinder Singh Sukhu)यांनी आज शपथ घेतली. ते हिमाचल प्रदेशचे 15वे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झालेत. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि पक्षाच्या राज्य युनिटच्या प्रमुख प्रतिभा सिंह यांची उपस्थिती होती. 

विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड 

हिमाचल विधानसभा निवडणुकीत एकूण 68 जागांपैकी 40 जागा जिंकून काँग्रेसने भाजपला सत्तेतून हद्दपार केले . 12 नोव्हेंबर रोजी मतदान झाले आणि गुरुवारी निकाल हाती आला. दरम्यान, सिमला येथे काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सुक्‍खू यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली होती. चार वेळा आमदार राहिलेले, सुक्‍खू हे बस ड्रायव्हरचे सुपूत्र आहेत. त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला शिमला येथील हिमाचल प्रदेश विद्यापीठाच्या कॅम्पसमधून सुरुवात केली. काँग्रेस निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख असलेले 58 वर्षीय सुखविंदर सिंह सुक्‍खू हिमाचल प्रदेशातून मुख्यमंत्री झाले आहेत. प्रेमकुमार धुमल यांच्यानंतर हमीरपूर जिल्ह्यातील मुख्यमंत्रीपद भूषवणारे ते दुसरे नेते आहेत.

मुकेश अग्निहोत्री उपमुख्यमंत्री

राज्यपालांनी सुखविंदर सिंह यांना मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. याशिवाय दिग्गज नेते मुकेश अग्निहोत्री हिमाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री बनले आहेत. राज्यपालांनी मुकेश अग्निहोत्री यांनाही शपथ दिली आहे. सुखविंदर सिंह आणि मुकेश अग्निहोत्री हे दोघेही चार वेळा आमदार आहेत. 

हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथील रिझ मैदानावर शपथविधी सोहळा पार पडला. मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सिंग सुखू आणि उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांच्या शपथविधी सोहळ्याला काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते पोहोचले. राहुल गांधी, प्रियांका गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यासह अनेक नेते शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.

हिमाचलचे 15 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ  

जाणून घ्या सुखविंदर सिंह सिंग सुखू यांनी हिमाचल प्रदेशचे 15 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी म्हणाल्या की, त्यांच्या पक्षाने राज्यासाठी जी काही आश्वासने दिली आहेत ती पूर्ण केली जातील. विशेष म्हणजे हिमाचल प्रदेशमध्ये दर 5 वर्षांनी राज्य सरकार बदलण्याची प्रथा यावेळीही सुरु आहे. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळाले. एकूण 68 जागा असलेल्या हिमाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला 40 जागा मिळाल्या. याशिवाय भाजपच्या 25 जागा कमी झाल्या. त्याचवेळी विधानसभेच्या 3 जागा इतर उमेदवारांच्या खात्यात गेल्या.