Police Constable Body Builder : पोलीस कॉन्स्टेबलची Body पाहून बघणाऱ्यांनीही तोंडात घातली बोट!

Body Builder Police Constable: हल्ली बॉडी बनवणं हा आपल्या जीवनशैलीचा (body) भाग बनला आहे. आजकालची मुलं जी जिममध्ये बॉडी बनवायला जातात. त्याचसोबतच आपल्या सीक्स पॅक्सचे व्हिडीओ तसेच फोटो हे इन्टाग्रामवर (body building instagram video) शेअर करत असतात.

Updated: Dec 11, 2022, 03:23 PM IST
Police Constable Body Builder : पोलीस कॉन्स्टेबलची Body पाहून बघणाऱ्यांनीही तोंडात घातली बोट!  title=
body builder police constable

Body Builder Police Constable: हल्ली बॉडी बनवणं हा आपल्या जीवनशैलीचा (body) भाग बनला आहे. आजकालची मुलं जी जिममध्ये बॉडी बनवायला जातात. त्याचसोबतच आपल्या सीक्स पॅक्सचे व्हिडीओ तसेच फोटो हे इन्टाग्रामवर (body building instagram video) शेअर करत असतात. अशा फोटोंना लाखो, करोडो लाईक्स आणि व्ह्यूजही मिळत असतात. सेलिब्रेटींचा विषय येतो तेव्हा फॅशन, ग्लॅमरस, बॉडी बिल्डिंग, बिकीनी लुक्स, मोनोकिनी, स्विमिंग लुक, असे  नानाप्रकारचे हॅशटॅग्सही फिरत असतात. त्यामुळे आता इन्टाग्रामसारख्या प्रभावी माध्यमावर अथवा कुठल्याही सोशल मीडियाच्या माध्यमावर सक्रिय असणारी तरूणपिढी आपलं स्वत:चं फॅनफॉलिंग तयार करते आहे. त्यामुळे अशावेळी आजकाल सर्वच प्रकारच्या संस्कृतीतील तरूण मुलं या सोशल मीडिया ट्रेण्ड्सना फोलो करताना दिसतात. त्यातून बॉडी बिल्डिंग हाही त्यातलाच एक ट्रेण्ड आहे. (Police Constable Body Builder journey from slim to fit will inspire you know more)

आज सोशल मीडियावर असे अनेक फिटनेस फ्रिक आहेत ज्यांचे फॅन फॉलिंईंग सोशल मीडियावर भरपुर आहे. आज असा कोणी फिटनेस फ्रिक नाहीत जे लोकांना आकर्षित करत नाहीत. सध्या असे इन्फ्लूएन्सर सोशल मीडियावर खूप आहेत. पोलिस हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. सध्या असा एक पोलिस कॉन्स्टेबल (police constanble) आहे ज्यांची सध्या संपुर्ण भारतात जोरदार चर्चा आहे. रोहित जांगीड हा जयपूरचा रहिवासी असून तो राजस्थान पोलिसात हवालदार आहे. रोहित हा आंतरराष्ट्रीय वुशू खेळाडू (चीनी मार्शल आर्ट) खेळाडू आहे आणि त्याने अनेक आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय पदकेही जिंकली आहेत. परंतु त्याची बॉडी बघून भलेभले फिदा होतील. 

फिटनेसचे रहस्य

6 पॅक अॅब्स (6 back abs) असलेला पोलीस कॉन्स्टेबल रोहित जांगिडने नुकताच मीडियाशी बोलताना त्याचा फिटनेस प्रवास, डाएट रूटीन आणि संपूर्ण वर्कआउट आणि फिटनेस प्लॅन शेअर केलं आहे. एक सर्वसामान्य मुलगा आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि बॉडी बिल्डर कसा बनला? त्याच्या या प्रवासाची कहाणी सध्या व्हायरल होत आहे. सध्या रोहितचा हा प्रेरणादायी प्रवास पोलिस खात्याची शान बनला आहे. रोहित हा शाकाहारी आहे आणि सेलिब्रेटींप्रमाणे तोही फिटनेस फ्रिक (fitness video online) आहे आणि जिममध्ये जाऊन बॉडी बनवतो. 

लोक मला टोमणे मारायचे 

रोहितनं आपला प्रेरणादायी प्रवास सांगताना आपल्या आयुष्यातील वाईट अनुभवही सांगितले. तो जेव्हा शाळेत होतो तेव्हा त्याचे वजन केवळ 40 किलो एवढे होते. त्यामुळे तो अत्यंत हडकुळा होता. या कारणानेच विद्यार्थ्यी त्याला शाळेत असताना चिडवायचे. रोहित म्हणाला, मी जेव्हा माझ्या रोल मॉडेलकडे वूशु या स्पर्धेसाठी बॉडी बिल्डिंग (body building competition) आणि स्पॉर्ट्स शिकण्यासाठी परवानगी मागायला गेलो तेव्हा त्यांनी मला भरपूर पांठिबा दिला. सगळ्यात पहिल्यांदा मला वजन वाढवण्यासाठी प्रोटीन सप्लिमेंट आणि मल्टिव्हिटॅमिन खाण्यास सांगितले होते. नवीन डाएट फोलो करण्यासाठी सांगितले होते. आणि त्यानूसार मी तसं करत होतो. आणि काही दिवसांनी मला त्याचा परिणाम दिसू लागला. तेव्हा मी भोपाळच्या वुशू स्पर्धेत पहिले पदक मिळाले. तेव्हा मला माझ्या चांगल्या गुणांची जाणीव झाली आणि मी मागे वळून पाहिलेच नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार - 

रोहितला राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडून सर्वोत्कृष्ट खेळाडूचा राज्य पुरस्कारही (award) मिळाला आहे. यासह त्याला वीर तेजा पुरस्कार, रायझिंग स्टार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रीय पदक मिळाल्यानंतर त्याला 2018 साली राजस्थान पोलिसमध्ये हवालदाराची नोकरी मिळाली. रोहित जांगीड सांगतो की आजही तो दिवसातून दोनदा म्हणजे सकाळ आणि संध्याकाळी 2-2 तास व्यायाम करतो.