शॉपिंगला गेल्यावर खर्च अधिक होतो? वापरा सुधा मुर्तींच्या 'या' टीप्स

Sudha Murthy Tips for Saving: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे सुधा मुर्तींची. आपल्याला त्यांच्या अनेक गोष्टी या फार शिकण्यासारख्या वाटतात. त्यामुळे आपण त्या फॉलो करतो. चला तर मग जाणून घेऊया की जेव्हा जास्त पैसे खर्च होतात. तेव्हा आपण नक्की कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी. आपण या काही टीप्स सुधा मुर्ती यांच्याकडून शिकू शकतो.             

गायत्री हसबनीस | Updated: Oct 13, 2023, 06:17 PM IST
शॉपिंगला गेल्यावर खर्च अधिक होतो? वापरा सुधा मुर्तींच्या 'या' टीप्स  title=
sudha murthy tips on cutting the shopping expenses latest lifestyle news in marathi

Sudha Murthy Tips for Saving: आपल्याला शॉपिंगची चांगलीच आवड असते. त्यातून आपल्यालाही नेहमी असंच वाटतं असतं की आपणंही जास्तीच जास्त वेळ शॉपिंग करावी. त्यातून आपलीही अशी इच्छा असते की आपल्या खात्यात प्रचंड पैसे यावेत आणि आपल्यालाही भरपूर पैसे मिळावेत आणि आपण भरपुर शॉपिंग करावी. अनेकदा आपल्या पतीला याचा बराच त्रास होताना दिसतो. शॉपिंग म्हटलं की ते आपल्यासोबत येत नाहीत आणि मग पती-पत्नींमध्ये नाराजीनाट्य सुरू होते. परंतु कुठेतरी आपल्याला यावर ताबा ठेवणे फार फार महत्त्वाचे असते अशीही आपल्याला शिकवण मिळत असते. त्यामुळे तुम्हाला जर का असं वाटतं असेल की तुम्ही फारच जास्त खर्च करता तर मग तुम्हाला सुधा मुर्तींच्या या काही गोष्टी नक्कीच शिकू शकता. चला तर मग या लेखातून जाणून घेऊया की नक्की आपण यातून काय काय शिकू शकतो. खूप जास्त गोष्टी आपण यातून शिकू शकतो. 

खरंतर खर्च हा आपल्या हातात नाही. त्यातून अवाढव्य खर्चही आपल्या हातात नसतो. त्यामुळे अशावेळी आपण काहीच करू शकत नाही. आजकाल महागाई ही फारच वाढली आहे त्यातून आता आपल्या गरजाही प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे आपल्याला आपापल्या पद्धतीनं पैसे साठवणं हे फार महत्त्वाचं आहे. मग त्यासाठी आपण विविध क्लृप्त्याही काढतो. अनेक योजनांमध्येही आपण आपले पैसे साठवायचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे त्याचे आपण चांगलेच नियोजन आणि व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करत असतो. ज्याच्या आपल्यालाही अनेकदा फायदा होताना दिसतो. परंतु दररोज खर्च करण्यासाठी आपण सारखेच आतुर असतो. अशातच आपलं लक्ष असतं ते म्हणजे आपण आपला खर्चही कसा वाचवू शकतो. चला तर यासाठी सुधा मुर्तींनी दिलेल्या काही टीप्स लक्षात घेऊया. 

हेही वाचा : कुणी काम देतं का कामं? 200 चित्रपट करणाऱ्या नटसम्राटाची दयनीय अवस्था

  • सुधा मुर्ती म्हणतात की जर तुम्हाला 7000 रूपयांची साडी खरेदी करायची असले तर पहिल्यांदा तुम्ही हा विचार करायला पाहिजे की तुम्ही ही साडी 7000 वेळा वा 70 वेळा परिधान कराल?
  • तेव्हाच जर का आपण 2000 रूपयांची साडी परिधान केली तर आपण निदान ती साडी 20 किंवा 30 वेळा तरी घालू शकतो. 
  • सुधा मुर्ती यांचा हाच फंडा आहे की ज्याचा आपण जास्त उपयोग करून घेऊ त्याच्या खर्चाचाही आपण विचार करू 
  • तुम्ही अशा गोष्टी या आपल्या दैनंदिन जीवनात लागू करून घेऊ शकता. 
  • तुम्ही तुमच्या सोयीनं या गोष्टी करू शकता.