'लहान मुलगा!' नारायण मुर्तींना पहिल्यांदा पाहिल्यावर सुधा मुर्तींची अजब प्रतिक्रिया, जोडपं आज 55 वर्षे एकत्र

Sudha Murthy Birthday: सुधा मुर्ती यांचा आज वाढदिवस आहे. त्यांची प्रेरणा आज तरूणाईही घेताना दिसते. परंतु तुम्हाला माहितीये का की नारायण मुर्ती आणि सुधा मुर्ती यांची हटके लव्ह स्टोरी काय आहे? दोन मिनिटं वेळ काढा आणि वाचा हा इंटरेस्टिंग लेख!

गायत्री हसबनीस | Updated: Aug 19, 2023, 11:24 AM IST
'लहान मुलगा!' नारायण मुर्तींना पहिल्यांदा पाहिल्यावर सुधा मुर्तींची अजब प्रतिक्रिया, जोडपं आज 55 वर्षे एकत्र  title=
August 19, 2023 | sudha murthy explains her reaction when she first met narayan murthy

Sudha Murthy: Infosys चे संस्थापक नारायण मुर्ती यांच्या पत्नी सुधा मुर्ती यांचा आज वाढदिवस आहे. सुधा मुर्ती सगळ्यांसाठी प्रेरणा आहेत. त्यांच्या लेखनामुळे, विचारांमुळे आणि त्यांच्या लाघवी अन् गोड व्यक्तिमत्त्वामुळे त्यांना ऐकायला प्रत्येकालाच आवडते. त्यामुळे त्यांची अनेकदा सोशल मीडियावर चर्चा असते. 70s च्या काळातलं प्रेम हे किती अमुल्य आणि हटके होतं ना? आज सोशल मीडिया काळातलं, डिजिटल प्रेम आहे. तेव्हा मात्र असं काहीच नव्हतं. कॉम्यूटर आणि हेडफोन्स नुकतेच येयला लागेल होते. तेव्हा कम्यूनिकेशनची साधनं होती ती फक्त फोन आणि पत्रं. त्यातून तेव्हाची फॅशनही युनिक, व्हिटेंज, रेट्रो वेगळी वेगळी. त्यामुळे तेव्हा तरूणाईच्या आयुष्यात फार वेगळं आणि रोमाचंक घडलंच असेल ना. त्यातून आज इतक्या वर्षांनंतर तेव्हाच्या तरूण पिढीची लव्हस्टोरी ऐकायला आपल्याला किती गंमत वाटते नाही का? आज आम्ही तुम्हाला अशीच एक हटके स्टोरी आम्ही सांगणार आहोत. 

सुधा मुर्ती आणि नारायण मुर्ती यांची पहिली भेट 

सुधा मुर्ती यांची नारायण मुर्तींची पहिली भेट म्हणजे एक वेगळा किस्सा होता. मध्यंतरी सुधा मुर्ती या 'द कपिल शर्मा शो'मध्ये उपस्थित होत्या. यावेळी त्यांच्यासोबत गुरमित मोंगा आणि रविना टंडनही उपस्थित होत्या. त्यांनी अनेक गोड किस्से सांगितले होते. त्यांनी त्यांच्या आणि नारायण मुर्तींच्या पहिल्या भेटीच्या किस्स्याबद्दल एक गंमत सांगितली होती. त्या म्हणाल्या की, 'मी नारायण मुर्ती यांना पहिल्यांदा भेटायला गेले होते. मला वाटलं की ते कोणी फिल्म स्टारचे सुपरहिरो वैगेरे असतील. अगदी डॅशिंग आणि हॅण्डसम पण जेव्हा त्यांनी घराचा दरवाजा उघडला तेव्हा मी त्यांना पाहून आश्चर्यचकित झाले, म्हणाले, हा लहान मुलगा?' 

पहिलं Introduction कसं झालं? 

सुधा मुर्ती याच शोमध्ये म्हणाल्या की, ''माझा एक मित्र होता, त्याचे नावं होते प्रसन्न, त्यावेळी तो रोज एक पुस्तक आणायचा. त्याच्या हातातल्या पुस्तकात नावं होते नारायण मुर्ती आणि सोबतच त्यात काहीतरी लिहिलेलं असायचं. या नावासोबत 'नारायण मुर्ती पेशावर', 'नारायण मुर्ती इत्म्बुल' असे काहीतरी लिहिलेले असायचे. तेव्हा मी म्हटलं, ''हे नारायण मुर्ती काय बस कंडक्टर आहेत की काय?''

डेटिंग आणि लग्न 

नारायण मुर्ती यांनी एकदा सुधा मुर्ती यांना डिनरसाठी बोलावले होते. त्यांच्या ग्रुपमध्ये बाकी सगळी मुलं होती आणि सोबतच त्या एकट्या होत्या. या ग्रुपमध्ये एकटी मुलगी म्हणून त्यांनी डिनरला जायला नकार दिला. परंतु नारायण मुर्ती यांनी त्यांना काही करून येण्यास सांगितले आणि त्या आल्या. त्यानंतर त्यांची मैत्री वाढली आणि मग ते एकमेकांना डेट करायला लागले. त्यांनी 1978 साली लग्नगाठ बांधली आणि आज गेली 55 वर्षे ते एकत्र आहेत. आहे की नाही हटके लव्ह स्टोरी 1970s ची?