मुंबई : Student Wrote Leave Application To Principal : जेव्हा विद्यार्थ्यांना शाळेत सुट्टी हवी असते तेव्हा मुख्याध्यापकांना लेखी अर्ज द्यावा लागतो. काही विद्यार्थी असे असतात की जे रजेसाठी काही तरी खोटे कारण पुढे करतात. अशाच एका विद्यार्थ्यांचा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अनेक वेळा विद्यार्थी सुट्टीसाठी खोटे बोलतात. कोणी नातेवाईकाच्या मृत्यूचे कारण सांगतात तर कोणी आजारपणाचे कारण सांगतात. मात्र, पकडले गेल्यास शिक्षाही होते. एका विद्यार्थ्याने तर मर्यादा ओलांडली, अर्ध्या दिवसाच्या रजेची अशी सबब त्याने सांगितली, जी मुख्याध्यापकांनाही मान्य करावीच लागली.
सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे, जी तीन वर्षे जुनी आहे, परंतु आजही लोकांना आश्चर्यचकित करीत आहे. एका विद्यार्थ्याने आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांना अर्ध्या दिवसाच्या सुट्टीसाठी अर्ज लिहिला. ज्यात त्याने असा बहाणा केला की कोणाचा विश्वास बसणार नाही.
विद्यार्थ्याने अर्जात लिहिले की, 'माझे निधन झाले आहे, मला अर्ध्या दिवसाची सुट्टी हवी आहे.' विद्यार्थ्याने हा अर्ज मुख्याध्यापकांना दिला आणि त्यांनी विद्यार्थ्याला सुट्टीही दिली. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील आहे.
आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने हे कृत्य केले आहे. विद्यार्थ्याने लिहिले की, 'आज 20 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 10 वाजता अर्जदाराचे निधन झाले आहे, आपणास विनंती आहे. की अर्जदाराला अर्ध्या दिवसाची रजा मंजूर करावी, ही मोठी कृपा होईल'.
सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे मुख्याध्यापकांनी लाल पेनाने ग्रँटेड लिहून सही केली. त्या विद्यार्थ्याने आपला अर्ज काही दिवस लपवून ठेवला, मात्र हा अर्ज मित्र आणि शिक्षकांमध्ये पोहोचताच तो चर्चेचा विषय बनला. आजही सोशल मीडियावर ही पोस्ट चर्चेचा विषय ठरीत आहे.