Umran Malik: काश्मीरच्या खोऱ्यातून आला जगातील सर्वात घातल बॉलर, वडील आहेत फळविक्रेते

भारतीय संघात समावेश करण्याची होऊ लागली मागणी.

Updated: Apr 28, 2022, 02:32 PM IST
Umran Malik: काश्मीरच्या खोऱ्यातून आला जगातील सर्वात घातल बॉलर, वडील आहेत फळविक्रेते title=

Umran Malik : आयपीएल 2022 (IPL 2022) बाबतच्या बातम्यांमध्ये सध्या एकच नाव सर्वात चर्चेत आहे. भारताचा युवा फास्ट बॉलर उमरान मलिक (Umran Malik) सध्या चर्चेत आहे. उमरानचा वेग पाहून जगातील अनेक क्रिकेट चाहते त्याचे फॅन झाले आहेत. काश्मीरचा हा युवा गोलंदाज भविष्यात भारताचा स्टार खेळाडू ठरु शकतो. उमरानला भारतीय संघात संधी देण्याची मागणी ही आता होऊ लागली आहे.

काश्मीरचा युवा गोलंदाज उमरान (Umran Malik) सध्या त्याच्या बॉलिंगमध्ये चर्चेत आलाय. उमरानचा वेग 150Kmph च्या वर आहे. आयपीएल 2022 मध्ये त्याने 8 सामन्यात 15 विकेट घेतले आहेत. पर्पल कॅपच्या स्पर्धेत तो युजवेंद्र चहल नंतर दुसऱ्या स्थानावर आहे. भारताकडे इतक्या वेगाने बॉल टाकणाऱ्या गोलंदाजांची संख्या खूपच कमी आहे.

उमरान मलिकला अजून डेब्यू करण्याची संधी मिळालेली नाही. जम्मू-काश्मीरच्या या खेळाडूला दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ ए मध्ये निवड करण्यात आली. पण त्याला खेळण्याची संधी नाही मिळाली. उमरान मलिक (Umran Malik) सध्या ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय ते पाहून दिग्गज फलंदाज देखील हैराण आहेत.

वडील आजही करतात फळ विक्री

उमरान मलिक (Umran Malik) चे वडील आज ही फळांचं दुकाने लावतात. उमरानचे वडील अब्दुल रशीद यांनी म्हटलं की, 'मुलाची कामगिरी पाहून मार्केटमधले लोकं आता त्यांना अधिक सन्मान देत आहेत. मुलाला देशासाठी वर्ल्डकपमध्ये खेळताना पाहायचं आहे. त्याला लहानपणापासूनच एक घातल बॉलर बनण्याची इच्छा होती.'