'तुमच्या कुटुंबाची शपथ फक्त....' उत्तरपत्रिकेतून विद्यार्थ्याची शिक्षकाला भावनिक साद

पास करण्यासाठी विद्यार्थ्याने असं काही केलं, उत्तरपत्रिकेत जे लिहिलंय ते वाचून हसावं की रडावं हाच प्रश्न

Updated: Jul 12, 2022, 01:08 PM IST
'तुमच्या कुटुंबाची शपथ फक्त....' उत्तरपत्रिकेतून विद्यार्थ्याची शिक्षकाला भावनिक साद title=

नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावर राजीनामा पत्र आणि शाळा-कॉलेजमधील पेपरमधील काही फोटो व्हायरल होत आहेत. कोणी उत्तराऐवजी गाणी लिहितं तर कोणी अजून भन्नाट गोष्टी करत असतं. आता मात्र हद्दच झाली. एक विद्यार्थ्याने चक्क शिक्षकालाच भावनिक साद घातली आहे. याचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

जेव्हा परीक्षेत अनेक प्रश्नांची उत्तरे कळत नाहीत, तेव्हा त्यांच्या लक्षात येते की आपण परीक्षेत नापास होऊ. याच भीतीने विद्यार्थी उत्तरपत्रिकेत असं काही लिहितो ते वाचून शिक्षकच चाट पडतात. परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने विद्यार्थ्याने शिक्षकाच्या कुटुंबीयांनाच चक्क मेसेज लिहिला आहे. 

एवढेच नाही तर विद्यार्थ्याने शिक्षकाच्या मुलाची शपथ घेऊन फक्त पासचे मार्क देण्याची विनंती केली. आता हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

मला फक्त पास होण्यापुरते 28 मार्क द्या. तुम्हाला तुमच्या कुटुंबाची शपथ आहे. तुम्हाला तुमच्या मुलाची शपथ आहे. हे लिहून या विद्यार्थ्याने एक स्माइल आणि हार्ट काढलं आहे. शेवटी आभारही व्यक्त केले आहेत. हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांना खूप जास्त ताण येतो. पास होणार की नाही याबाबत मनात भीती असते. त्यामुळे तो भावनिक साद घालत असा मेसेज लिहितो. याआधीही असे अनेक मजेशीर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता या विद्यार्थ्याचं पुढे काय होणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. तर सोशल मीडियावर युजर्सही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.